कराड येथे रोटरी जलतरण स्पर्धेस जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद
कराड येथे रोटरी जलतरण स्पर्धेस जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद
कराड, दि.22: रोटरी क्लब ऑफ कराड यांच्या वतीने कै.सौ.सु.ल.गद्रे यांच्या स्मरणार्थ सातारा जिल्हा हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने संगम हेल्थ क्लब येथे आयोजित जिल्हास्तरीय रोटरी जलतरण स्पर्धेस जिल्ह्यातील स्पर्धेकांची सहभाग घेतल्याने स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संगम हेल्थ क्लब येथे कै.सौ.सु.ल.गद्रे यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लब ऑफ कराड आयोजित रोटरी जलतरण स्पर्धेचे उद्घाटन संगम ग्रुपचे बाळासाहेब कुलकर्णी व रोटरी क्लबचे अध्यक्ष रामचंद्र लाखोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे सुधीर चोरगे, रोटरी क्लब ऑफ कराड सचिव आनंदा थोरात,
संगम हेल्थ क्लब प्रमुख मुरली वत्स, प्रोजेक्ट चेअरमन अजय भट्टड यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.
ही जलतरण स्पर्धा फ्री स्टाईल, ब्रेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक, बटर फ्लाय या प्रकारात चार वेगवेगळ्या वयानुसार गटात झाल्या. यास्पर्धेत 180 मुले व मुलींनी भाग घेतला होता. स्पर्धेसाठी रेफ्री, लाईफगार्ड, पंच, प्रमाणपत्र लेखन यांचे नियोजन संगम हेल्थ क्लबने केले. रोटरी क्लब ऑफ कराडच्या वतीने विजेत्या स्पर्धकांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे उत्कृष्ट स्विमर यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी काम केलेल्या रेफ्री, लाइफ गार्ड, पंच यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेचे नीटनेटके नियोजन व संयोजन मुरली वत्स, ओंकार ढेरे यांच्यासह सहकाऱ्यांनी केले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी म.रा.वि.वितरण कंपनी कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, रोटरी क्लब ऑफ पाटण पाटणचे याज्ञसेन पाटणकर, संजीव चव्हाण, शेंडे, रोटरी क्लब ऑफ उंब्रज रविराज पाटील, कराडचे माजी नगरसेवक सौरभ पाटील, पी.डी.पाटील बँक संचालक हेमंत ठक्कर, हर्ष भेदा आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रोटरी मित्र किरण जाधव, बद्रीनाथ धस्के, जगदीश वाघ, डॉ.शेखर कोगणूळकर, सुहास पवार, जयंत जगताप, शिवराज माने, गजानन कुसुरकर, राजगौंडा अपीने, विशाल घुटुकडे, राहुल पुरोहित, हर्षला देशमुख यांनी परिश्रम घेतले.

Comments
Post a Comment