कराडला रविवारी रुग्णांचे हक्क व अधिकार या विषयावर व्याख्यान


रविवारी 27 एप्रिल रोजी कराडला रुग्णांचे हक्क व अधिकार या विषयावर व्याख्यान

माजी खा. स्व. प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट व संकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजन

कराड, दि. 25 - माजी खा. स्व. प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट व संकल्प सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. २७) रुग्णांचे हक्क व अधिकार, या विषयावर व्याख्यान होणार आहे. रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांचे जाहीर व्याख्यान असून, सौ. वेणूताई चव्हाण सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या व्याख्यानात उमेश चव्हाण हे कराड व परिसरातील नागरिकांना वैद्यकीय मदत कशी मिळवावी, शासनाच्या उपचार व शस्त्रक्रियांसाठी लाखो रुपयांच्या योजना कोणत्या, रुग्णांचे हक्क व अधिकार काय आहेत, कोणत्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे संपूर्ण बिल माफ होते आदी महत्वाच्या विषयांवर व्याख्यान देणार आहेत. यावेळी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक