हिंदू एकता आंदोलन शिवजयंती उत्सव कमिटीचे पुरस्कार जाहीर;सागर आमले यांना हिंदू धर्म प्रचारक पुरस्कार
हिंदू एकता आंदोलन शिवजयंती उत्सव कमिटीचे पुरस्कार जाहीर;सागर आमले यांना हिंदू धर्म प्रचारक पुरस्कार
कराड, दि. 26 (प्रतिनिधी) - हिंदू एकता आंदोलन शिवजयंती उत्सव २०२५ निमित्ताने विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये २०२५ चा हिंदू धर्मयोद्धा पुरस्कार सुदर्शन न्यूजचे मुख्य संपादक वरिष्ठ पत्रकार डॉ. सुरेश चव्हाणके यांना तर हिंदू धर्म रणरागिणी पुरस्कार कु. शर्विका जितेन म्हात्रे, हिंदू धर्म संघटक पुरस्कार मुकुंद आफळे आणि हिंदू धर्म प्रचारक पुरस्कार सागर आमले यांना देण्यात येणार आहे.
डॉ. सुरेश चव्हाणके वरिष्ठ पत्रकार , मुख्य संपादक – सुदर्शन न्यूज यांनी आजच्या काळातील सर्वाधिक स्पष्टवक्ते, निर्भीड आणि राष्ट्रभक्त पत्रकारांपैकी एक म्हणून त्यांचे अग्रगण्य नाव आहे. त्यांनी आपल्या लेखणीने भारतीय पत्रकारितेला एक नवा चेहरा दिलेला आहे.त्यांच्या या कृतिशील कार्याच्या गौरवार्थ म्हणून हिंदू एकता आंदोलन, कराड या संघटनेतर्फे सन २०२५ चा “हिंदू धर्मयोद्धा पुरस्कार ” जाहीर करण्यात येत आहे.
कु. शर्विका जितेन म्हात्रे यांनी वयाच्या तिसऱ्या ते सहाव्या या ३ वर्षाच्या काळात नाशिक जिल्ह्यातील ‘ साल्हेर ’ किल्ला. महाराष्ट्रातील सर्वात उंच ‘ कळसूबाई ’ शिखर , गुजरात मधील सर्वात उंच ‘ गिरनार ’ शिखर , महाराष्ट्रातील सर्वात कठीण असा गिरिदुर्ग किल्ला असे तब्बल १४० किल्ले यांनी यशस्वीपणे सर केलेत. नामांकित पुरस्काराचे मानकरी ठरलेत. यांच्या कृतिशील कार्याच्या गौरवार्थ म्हणून हिंदू एकता आंदोलन कराड या संघटनेतर्फे सन २०२५ चा “ हिंदू धर्म रणरागिणी पुरस्कार ” जाहीर करण्यात येत आहे.
मुकुंद आफळे यांनी आपले जीवन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी व्यतीत केले आहे. ही अभिमानाची बाब आहे. धर्मो रक्षति रक्षित: या तत्वाने गेली अनेक वर्षे यांनी केवळ आणि केवळ हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करीत असताना हिंदू धर्म रक्षा व जागृतीसाठी जो ध्यास घेऊन कार्य करीत आहेत. त्याचबरोबर लव्ह जिहाद , गोरक्षा यासारख्या गंभीर विषयांवरही त्यांनी आपले तन-मन-धन अर्पून कृतीशीलतेने सेवा केली. हिंदू धर्म संघटीत राहण्यासाठी प्रचारकाच्या भूमिकेतून त्यांनी करीत असलेल्या सत्वशील कार्याची उचित नोंद घेतली म्हणून त्यांना हिंदू एकता आंदोलन च्या वतीने सन २०२५ चा “ हिंदू धर्म संघटक ” पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे.
सागर आमले यांनी अनेक वर्षे “ शिव प्रतिष्ठान ” च्या माध्यमातून पदभ्रमण मोहीम पार करीत असताना केवळ आणि केवळ हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करीत असताना हिंदू धर्म रक्षा व जागृतीसाठी त्यांनी ध्यास घेऊन कार्य करीत आहेत. हिंदू धर्म संघटीत करण्याच्या त्यांच्या कार्याची उचित नोंद घेतली त्याचबरोबर कृतिशील कार्याच्या गौरवार्थ म्हणून हिंदू एकता आंदोलन कराड आयोजित सन २०२५ चा “हिंदू धर्म प्रचारक ” पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे.
वरील मान्यवरांना पुरस्कार वितरण बुधवार दिनांक ३० एप्रिल २०२५ ऐतिहासिक दरबार मिरवणूकी ची सांगता सभेवेळी शिवतीर्थ, दत्त चौक कराड येथे करण्यात येईल.





Comments
Post a Comment