काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:'काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे' मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल


नॅशनल हेराल्ड केस - काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:'काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे' मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बेळगांव मध्ये घेणार पत्रकार परिषद 

कराड, दि. 21 - नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पहिल्या आरोपपत्रात सोनिया-राहुल यांची नावे समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस देशभरात पत्रकार परिषदा घेणार आहे. २१ ते २७ एप्रिल दरम्यान ५७ शहरांमध्ये ५७ पत्रकार परिषदा होतील. या मोहिमेला 'काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे' असे नाव देण्यात आले आहे. या काळात भाजपचा खोटेपणा समोर आणला जाईल, असे पक्षाने म्हटले आहे. 

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून 57 नेत्यांची यादीच प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, राजस्थान चे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर, मणिकम टागोर, गौरव गोगोई, सुप्रिया श्रीनेत, पवन खेरा, छत्तीसगड चे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, कन्हैया कुमार, रणदीप सिंग सुरजेवाला, राजीव शुक्ला, अलका लांबा अशा अनेक बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची बेळगांव येथे 23 एप्रिल रोजी सकाळी जिल्हा काँग्रेस कमिटी, बेळगाव येथे पत्रकार परिषद होणार आहे. 

१९ एप्रिल रोजी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस सरचिटणीस, राज्य प्रभारी आणि आघाडीच्या संघटनांच्या प्रमुखांच्या बैठकीत देशभरात पत्रकार परिषदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक