कराड नगर परिषदे कडून महात्मा फुले यांना अभिवादन
कराड नगर परिषदे कडून महात्मा फुले यांना अभिवादन
कराड, दि. 11 - अंधश्रद्धा, अन्याय आणि अज्ञानाविरुद्ध लढणारे, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, सामाजिक समतेचे प्रणेते, थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती दिनी शहरातील बुधवार पेठेत असणाऱ्या त्यांच्या पुतळ्यास आज कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर व अन्य अधिकारी कर्मचारी यांनी अभिवादन केले.
बुधवार पेठेत असणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यास आज सकाळी विविध मान्यवरांनी जयंतीनिमित्त अभिवादन केले. विविध सामाजिक संघटना व त्यांचे पदाधिकारी तसेच नगरपरिषदेचे उपमुख्यधिकारी समिधा पाटील, नगर अभियंता आर डी गायकवाड, विविध विभागाचे अधिकारी, कामगार संघटनेचे अध्यक्ष आनंदा खवळे, विविध विभागाचे मुकादम तसेच कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान कराड नगरपरिषद कार्यालयात ही क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्यासह विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.



Comments
Post a Comment