Posts

Showing posts from April, 2025

रुग्णांना आपल्या हक्काची सनद माहिती असावी : उमेश चव्हाण

Image
कराड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते रुग्ण हक्क परिषदेचे श्री उमेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. रुग्णांना आपल्या हक्काची सनद माहिती असावी : उमेश चव्हाण माजी खा. स्व. प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट व संकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने व्याख्यान. कराड, दि. 28 (प्रतिनिधी) : डॉक्टर हे हॉस्पिटलचे बांधील पद असून, धर्मादाय हॉस्पिटल अथवा चॅरिटेबल ट्रस्टचे चालक हेच महत्वाचे असतात. धर्मादाय हॉस्पिटल व चॅरिटेबल ट्रस्टचे दवाखाने गोरगरीब रुग्णांसाठी मोफत असतात. याची माहिती आपणास नसल्याने आपण अज्ञानपणाने त्या हॉस्पिटलच्या पिळवणूकीला बळी पडतो. याकरिता रुग्णांच्या हक्काची असणारी सनद आपल्याला माहिती असावी. असे मत रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केले. कराड येथील सौ. वेणूताई चव्हाण सभागृहात माजी खासदार (स्व.) प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट व संकल्प सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे तसेच रुग्णांचे हक्क व अधिकार या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, (स्व.) प्रेमीलाताई चव्हाण चॅरि...

येवती - म्हासोली प्रकल्पाच्या बंदिस्त पाईपलाईन आराखड्याला मंजुरी

Image
येवती - म्हासोली प्रकल्पाच्या बंदिस्त पाईपलाईन आराखड्याला मंजुरी आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश; जलसंपदा विभागाकडून मंजुरीचा आदेश कराड, दि. 27 -  आ. डॉ. अतुल भोसले यांनी वेळोवेळी केलेल्या प्रयत्नांमुळे, येवती - म्हासोली मध्यम प्रकल्प लाभक्षेत्राच्या सिंचनांतर्गत पाणी देण्यासाठी, करावयाच्या मुख्य बंदिस्त नलिका व वितरण व्यवस्था कामाच्या आराखड्याला जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच या बंदिस्त पाईपलाईन योजनेचे काम सुरू होणार असून, या योजनेच्या लाभक्षेत्रातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अधिक कार्यक्षम पद्धतीने पाणीपुरवठ्याची सोय उपलब्ध होणार आहे.  टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत १९९४ मध्ये येवती– म्हासोली मध्यम प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या अंतर्गत दक्षिण मांड नदीच्या तिरावरील येवती येथील धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचे वितरण केले जाते. हा डावा कालवा आणि त्याच्या लघुवितरिका बहुतांश डोंगराळ भागातून जातात. शिवाय या कालव्याच्या कामाला सुमारे ३० वर्षे उलटल्याने अनेक ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होते. ज्यामुळे शेवटच्या गावापर्यंत पाणी पू...

हिंदू एकता आंदोलन शिवजयंती उत्सव कमिटीचे पुरस्कार जाहीर;सागर आमले यांना हिंदू धर्म प्रचारक पुरस्कार

Image
हिंदू एकता आंदोलन शिवजयंती उत्सव कमिटीचे पुरस्कार जाहीर;सागर आमले यांना हिंदू धर्म प्रचारक पुरस्कार  कराड, दि. 26 (प्रतिनिधी) - हिंदू एकता आंदोलन शिवजयंती उत्सव २०२५ निमित्ताने विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये २०२५ चा हिंदू धर्मयोद्धा पुरस्कार सुदर्शन न्यूजचे मुख्य संपादक वरिष्ठ पत्रकार डॉ. सुरेश चव्हाणके यांना तर हिंदू धर्म रणरागिणी पुरस्कार कु. शर्विका जितेन म्हात्रे, हिंदू धर्म संघटक पुरस्कार मुकुंद आफळे आणि हिंदू धर्म प्रचारक पुरस्कार सागर आमले यांना देण्यात येणार आहे. डॉ. सुरेश चव्हाणके वरिष्ठ पत्रकार , मुख्य संपादक – सुदर्शन न्यूज यांनी आजच्या काळातील सर्वाधिक स्पष्टवक्ते, निर्भीड आणि राष्ट्रभक्त पत्रकारांपैकी एक म्हणून त्यांचे अग्रगण्य नाव आहे. त्यांनी आपल्या लेखणीने भारतीय पत्रकारितेला एक नवा चेहरा दिलेला आहे.त्यांच्या या कृतिशील कार्याच्या गौरवार्थ म्हणून हिंदू एकता आंदोलन, कराड या संघटनेतर्फे सन २०२५ चा “हिंदू धर्मयोद्धा पुरस्कार ” जाहीर करण्यात येत आहे. कु. शर्विका जितेन म्हात्रे यांनी वयाच्या तिसऱ्या ते सहाव्या या ३ वर्षाच्या काळात नाशिक जिल्ह्यातील ‘ साल...

कराडला रविवारी रुग्णांचे हक्क व अधिकार या विषयावर व्याख्यान

Image
रविवारी 27 एप्रिल रोजी कराडला रुग्णांचे हक्क व अधिकार या विषयावर व्याख्यान माजी खा. स्व. प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट व संकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजन कराड, दि. 25 - माजी खा. स्व. प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट व संकल्प सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. २७) रुग्णांचे हक्क व अधिकार, या विषयावर व्याख्यान होणार आहे. रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांचे जाहीर व्याख्यान असून, सौ. वेणूताई चव्हाण सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. या व्याख्यानात उमेश चव्हाण हे कराड व परिसरातील नागरिकांना वैद्यकीय मदत कशी मिळवावी, शासनाच्या उपचार व शस्त्रक्रियांसाठी लाखो रुपयांच्या योजना कोणत्या, रुग्णांचे हक्क व अधिकार काय आहेत, कोणत्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे संपूर्ण बिल माफ होते आदी महत्वाच्या विषयांवर व्याख्यान देणार आहेत. यावेळी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

काश्मीरमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील ७ प्रवाशांचा परतीचा मार्ग सुकर

Image
काश्मीरमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील ७ प्रवाशांचा परतीचा मार्ग सुकर आ.डॉ. अतुलबाबा भोसलेंकडून तिकिटाची व्यवस्था; शनिवारी रात्री परतणार पर्यटक कराड, दि. 25 : काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या आणि अतिरेकी हल्ल्यामुळे तिथेच अडकून पडलेल्या कराड व सातारा येथील ७ पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले पुढे सरसावले आहेत. त्यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या सातही प्रवाशांच्या विमान व रेल्वे तिकिटांची व्यवस्था केल्याने, हे पर्यटक शनिवारी (ता. २६) रात्री उशिरा कराडमध्ये सुखरुप परतणार आहेत.  कराडमधील इंटेरियर डिझायनर महेश मिलिंद कुलकर्णी हे आपल्या कुटुंबासमवेत काश्मीरला पर्यटनाला गेले होते. त्यांच्यासमवेत माधवी मिलिंद कुलकर्णी, श्रीधर शामराव क्षीरसागर, वर्षा श्रीधर क्षीरसागर, सुखदा श्रीधर क्षीरसागर हे कराडचे रहिवाशी; तर शरद हरिभाऊ पवार व विद्या शरद पवार हे सातारचे दोघे पर्यटक होते. पहेलगाम येथे अतिरेक्यांनी जेव्हा भ्याड हल्ला केला तेव्हा हे पर्यटक गुलमर्गमध्ये होते. त्यानंतर ते तातडीने श्रीनगरमध्ये निवासाच्या ठिकाणी पोहचले. दरम्यान, या अतिरेकी ...

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम बांधवाकडून निषेध; पाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाईची मागणी...

Image
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम बांधवाकडून निषेध; पाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाईची मागणी कराड, दि. 25 (प्रतिनिधी) - जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथिल घटना अमानवीय आणि निंदनीय असून भारताच्या एकतेला व शांततेला आव्हान देणारी आहे. या हल्ल्याचा कराड शहरातील मुस्लीम बांधव तीव्र निषेध व्यक्त करीत असून दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रपती यांच्या नावे कराड तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात कराड शहर मुस्लिम जमातीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार, हारून तांबोळी, बरकत पटवेकर, रमजान कागदी, मन्सूर तांबोळी, साबीरमिया मुल्ला, अबुबकर शेख, कैस काजी, मजीद आंबेकरी, हाजी नदीम सुतार, हाजी मजहर कागदी, हाजी इरफान सय्यद, अहमद मोमीन,  यावेळी उपस्थित होते.  कराड शहर मुस्लिम जमात कराडच्या वतीने दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, पहलगाम, जम्मू आणि काश्मीर येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण राष्ट्र हादरले आहे. या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांना, मुख्यतः पर्यटकांना, आपले प्राण गमवावे लागले....

कराड तालुक्यातील 201 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

Image
कराड तालुक्यातील 201 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर   कराड, दि. 24 - कराड तालुक्यातील 201 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण आज सकाळी येथील यशवंतराव चव्हाण स्मृति सदनात जाहीर करण्यात आले. राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या अनेक गावात सरपंच पद राखीव झाल्याने अनेक जणांची विकेट तर काही महत्त्वाच्या गावात सरपंच आरक्षणाने काही जणांना लॉटरी लागली आहे. 201 ग्रामपंचायत पैकी 61 गावांमध्ये सर्वसाधारण तर 62 गावांमध्ये सर्वसाधारण महिला राखीव, 27 गावांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी तर 12 गावात अनुसूचित जाती महिला, 12 गावात अनुसूचित जाती, एका गावात अनुसूचित जमाती महिलांसाठी तर 26 गावात नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. अनुसूचित जाती महिलांसाठी - आणे, आरेवाडी, बेलवाडी, चोरजवाडी, विठोबाचीवाडी, घोणशी, भोसलेवाडी, वडोली भिकेश्वर, केसे, बनवडी, मालखेड, खोडशी  अनुसूचित जाती - शेळकेवाडी (म्हासोली),भोळेवाडी, बामणवाडी, सयापूर, वराडे, येवती, विरवडे, हनूमानवाडी, हवेलवाडी, माळवाडी, पवारवाडी, नडशी. अनुसूचित जमाती महिला - सुपने  नागरिकांचा मागास प्रव...

श्रीनगर मध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी सरकारने विशेष विमानाची व्यवस्था करावी - पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

Image
श्रीनगर मध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी सरकारने विशेष विमानाची व्यवस्था करावी - पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी कराड, दि. 24 : जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 27 ते 30 पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत, तसेच झालेल्या घटनेमुळे देशातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीर मध्ये अडकले असल्याच्या बातम्या आहेत. त्यामध्ये कराड व साताराचे सुद्धा पर्यटक अडकले असल्याची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडचे पर्यटक महेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. अजूनही कराडचे पर्यटक मदतीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती श्री कुलकर्णी यांनी पृथ्वीराज बाबांना दिली.  यावेळी पृथ्वीराज बाबांनी श्री कुलकर्णी यांना आधार देत संयम ठेवण्याची विनंती केली, तुम्हाला मदत नक्की मिळेल तुम्ही लवकरात लवकर कराड ला पोहचाल यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन पृथ्वीराज बाबांनी दिले. श्री कुलकर्णी यांच्या सोबत बोलण झाल्यानंतर पृथ्वीराज बाबांनी तात्काळ परराष्ट्र सचिव व महाराष्ट्राच्या सचिवांशी संपर्क साधून कराडच्या तसेच महाराष्ट्राती...

काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:'काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे' मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Image
नॅशनल हेराल्ड केस - काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:'काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे' मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बेळगांव मध्ये घेणार पत्रकार परिषद  कराड, दि. 21 - नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पहिल्या आरोपपत्रात सोनिया-राहुल यांची नावे समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस देशभरात पत्रकार परिषदा घेणार आहे. २१ ते २७ एप्रिल दरम्यान ५७ शहरांमध्ये ५७ पत्रकार परिषदा होतील. या मोहिमेला 'काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे' असे नाव देण्यात आले आहे. या काळात भाजपचा खोटेपणा समोर आणला जाईल, असे पक्षाने म्हटले आहे.  अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून 57 नेत्यांची यादीच प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, राजस्थान चे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर, मणिकम टागोर, गौरव गोगोई, सुप्रिया श्रीनेत, पवन खेरा, छत्तीसगड चे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, कन्हैया कुमार, रणदीप सिंग सुरजेवाला, राजीव शुक्ला, अलका लांबा अश...

ध्येय प्राप्तीसाठी प्रसंगी अवघड वाटा चोखाळा:अल्ट्रा रनर आशिष कासोदेकर

Image
कराड - अल्ट्रा रनर आशिष कासोदेकर यांचा सत्कार करताना डॉ. सुभाषराव एरम, रो.राजीव रावळ, रो. रामचंद्र लाखोले, रो.आनंदा थोरात. ध्येय प्राप्तीसाठी प्रसंगी अवघड वाटा चोखाळा:अल्ट्रा रनर आशिष कासोदेकर  विश्वविक्रमवीर धावपटूने कराडकरांसमोर उलगडला जीवनपट: कराड रोटरी अवॉर्ड सोहळ्यात विविध मान्यवर सन्मानित  कराड, दि.14 : ध्येय निश्चिती केल्यावर थांबू नका. ध्येय गाठण्यासाठी वेळप्रसंगी अवघड वाटा चोखाळा. ध्येय प्राप्त करण्यासाठी वेडे होऊन अथक परिश्रम, मेहनत घ्या, असे आवाहन विश्वविक्रमवीर अल्ट्रा रनर आशिष कासोदेकर यांनी केले. रोटरी क्लब ऑफ कराड आयोजित कराड रोटरी अवॉर्ड यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन (टाऊनहॉल) येथे संपन्न झाला. या सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास कराड अर्बन बँकेचे चेअरमन डॉ.सुभाषराव एरम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सहाय्यक प्रांतपाल रो.राजीव रावळ, क्लबचे अध्यक्ष रो.रामचंद्र लाखोले, सचिव रो.आनंदा थोरात, प्रोजेक्ट चेअरमन रो.अभय नांगरे यांची उपस्थिती होती. या रोटरी क्लब ऑफ कराडतर्फे होणाऱ्या प्रेरणादायी व्होकेशनल अवॉर्ड गौरव समारंभात कराड रोटरी अवॉर्ड पुरस्कारांने उद्योग क्...

कराडमध्ये ‘हिंदु एकता’तर्फे शिवजयंती उत्सवाचे आयोजन

Image
कराड  : शिवजयंती उत्सवाची माहिती देताना हिंदू एकता आंदोलनचे प्रांतिक अध्यक्ष विनायक पावसकर समवेत इतर पदाधिकारी कराडमध्ये ‘हिंदु एकता’तर्फे शिवजयंती उत्सवाचे  आयोजन  २८ ते ३० एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रम, चार पुरस्कारांची घोषणा कराड, दि. 11  - हिंदु एकता आंदोलनतर्फे शिवजयंती उत्सवाचे हे ५५ वे वर्ष असून या उत्सवात भव्य दरबार मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांनी शिवजयंती उत्सव २०२५ साजरा करण्यात येणार असल्याची माहिती हिंदू एकता आंदोलनचे प्रांतिक अध्यक्ष विनायक पावसकर यांनी दिली. सातारा जिल्हा कार्याध्यक्ष राहुल यादव, संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जिरंगे, कराड शहराध्यक्ष प्रकाश जाधव यांची प्रमुख उपस्थित होते. श्री. पावसकर म्हणाले, ‘वर्ण जात विसरून जावू, हिंदु सार एक होऊ’ यानुसार हिंदु एकता आंदोलनच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, समस्त हिंदुंचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव २८ ते ३० एप्रिल या कालावधीत कराड परिसरात पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये सोमवार (दि. २८) रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातील चावडी चौकात छत्रपती श्री शिवाजी महार...

वाठार येथे अल्पवयीन मुलीकडून चिमुरडीचा गळा आवळून खून

Image
वाठार येथे अल्पवयीन मुलीकडून चिमुरडीचा गळा आवळून खून कारण अस्पष्ट; पोलिसांकडून अनेकाकडे चौकशी सुरू कराड दि. 11 (प्रतिनिधी) - वाठार ता. कराड येथून गुरुवारी सायंकाळी बेपत्ता झालेल्या मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी दिली. संस्कृती रामचंद्र जाधव (वय 5) असे या मुलीचे नाव असून तिचा 14 वर्षाच्या मुलीने गळा दाबून खून केल्याची कबुली दिली असली तरी खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. संस्कृती ही गुरुवारी सायंकाळी बेपत्ता झाली होती. गुरुवारी व शुक्रवारी पहाटेपर्यंत या घटनेचा तपास सुरू होता. रात्रभर ड्रोनच्या साह्याने त्याचबरोबर परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध मोहीम राबवल्या नंतर शुक्रवारी पहाटे शेतात मुलीचा मृतदेह आढळला. या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी अल्पवयीन 14 वर्षीय मुलीला ताब्यात घेतले असून सात ते आठ जणांकडे चौकशी सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. वाठार येथील संस्कृती जाधव ही पाच वर्षे मुलगी गुरुवारी सायंकाळी घरासमोरील अंगणात खेळत होती. तेथून ती अचानक बेपत...

कराड नगर परिषदे कडून महात्मा फुले यांना अभिवादन

Image
कराड नगर परिषदे कडून महात्मा फुले यांना अभिवादन कराड, दि. 11 - अंधश्रद्धा, अन्याय आणि अज्ञानाविरुद्ध लढणारे, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, सामाजिक समतेचे प्रणेते, थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती दिनी शहरातील बुधवार पेठेत असणाऱ्या त्यांच्या पुतळ्यास आज कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर व अन्य अधिकारी कर्मचारी यांनी अभिवादन केले. बुधवार पेठेत असणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यास आज सकाळी विविध मान्यवरांनी जयंतीनिमित्त अभिवादन केले. विविध सामाजिक संघटना व त्यांचे पदाधिकारी तसेच नगरपरिषदेचे उपमुख्यधिकारी समिधा पाटील, नगर अभियंता आर डी गायकवाड, विविध विभागाचे अधिकारी, कामगार संघटनेचे अध्यक्ष आनंदा खवळे, विविध विभागाचे मुकादम तसेच कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान कराड नगरपरिषद कार्यालयात ही क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्यासह विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

नर्सिंग क्षेत्रात कार्यरत असण्याचा अभिमान बाळगा : डॉ. रुपा रावत- सिंघवी

Image
कराड : कृष्णा विश्व विद्यापीठाच्या नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शपथ प्रदान करताना डॉ. रुपा रावत–सिंघवी व डॉ. वैशाली मोहिते. नर्सिंग क्षेत्रात कार्यरत असण्याचा अभिमान बाळगा : डॉ. रुपा रावत- सिंघवी ए.आय. वापरा; पण मानवी बुद्धीमत्तेला दुर्लक्षित करु नका : डॉ. रुपा रावत-सिंघवी कृष्णा विश्व विद्यापीठातील नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा शपथग्रहण सोहळा उत्साहात कराड, दि. 10 : नर्सिंग हे एक ग्लोबल प्रोफेशन आहे. नर्सिंग अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी नर्सिंग क्षेत्रात कार्यरत असण्याचा अभिमान बाळगावा. तसेच बदलत्या काळानुसार कृत्रिम बुद्धीमत्तेचा (ए.आय.) जरुर वापर करा; पण मानवी बुद्धीमत्तेला दुर्लक्षित करु नका, असे आवाहन नवी दिल्ली येथील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या जयप्रकाश नारायण अपेक्स ट्रॉमा सेंटरच्या डॉ. रुपा रावत–सिंघवी यांनी केले. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या नर्सिंग अधिविभागातील विद्यार्थ्यांच्या शपथग्रहण सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले होते. डॉ. रुपा रावत–सिंघवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रम...

कृष्णा सहकारी बँकेचा एकूण व्यवसाय १२११ कोटी रुपये : आ. डॉ. अतुलबाबा भोसले

Image
कृष्णा सहकारी बँकेचा एकूण व्यवसाय १२११ कोटी रुपये : आ. डॉ. अतुलबाबा भोसले सलग ११ वर्षे एन.पी.ए. शून्य टक्के; सी.आर.ए.आर.चे प्रमाण १९.१७ टक्के कराड, दि. 7 - रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी बँकेने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात १२११ कोटी ७४ लाख रुपयांचा एकूण व्यवसाय करत, १८ कोटी ९९ लाखांचा ढोबळ नफा प्राप्त केला आहे. तसेच बँकेने सलग ११ व्या वर्षी निव्वळ एन.पी.ए. शून्य टक्के राखण्यात यश मिळविले आहे. रिझर्व्ह बँकेच्या निकषाप्रमाणे बँकेच्या भांडवल पर्याप्तता निधी (सी.आर.ए.आर.) चे प्रमाण १२ टक्के आवश्यक असते; ते १९.१७ टक्के इतके आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याची माहिती, चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली आहे. याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानून, लोकांना बचतीची सवय लागावी व गरजेनुसार कर्ज घेता यावे, यासाठी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांनी कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा...

सह्याद्री कारखाना बाळासाहेब पाटलां कडेच; विरोधकांचा 21-0 ने धुव्वा.

Image
सह्याद्री कारखाना बाळासाहेब पाटलां कडेच; विरोधकांचा 21-0 ने धुव्वा. पी डी पाटील पॅनलच्या हजारो समर्थकांचा कराडात जल्लोष...भव्य मिरवणूक...बाळासाहेब पाटील यांनी मानले मतदारांचे आभार कराड, दि. 6 (प्रतिनिधी) - सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अखेर माजी मंत्री व विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या पी डी पाटील पॅनलने बाजी मारत भाजपाचे कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, भाजपाचे स्थानिक पदाधिकारी रामकृष्ण वेताळ (ग्रामपंचायत सदस्य ही झाले नाहीत), भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (मनोज घोरपडे आमदार झाल्याची सल), काँग्रेसचे सरचिटणीस एड. उदयसिंह पाटील उंडाळकर (हे प्रचारात नव्हते... मुद्दाम आले नाहीत?), काँग्रेसचे तालुका अध्यक्ष निवास थोरात (अति आत्मविश्वास...यांची उमेदवारी उडाली) अशा या अति महत्वकांक्षा बाळगणाऱ्या विरोधकांच्या पॅनेलचा 21- 0 शून्य असा धुव्वा उडाला.  या निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी डी पाटील पॅनलने विरोधकांचा सात ते आठ हजारांच्या मताधिक्याने पराभव करत सह्याद्रीवर वर्चस्व कायम ठेवले. या निवडणुकीत पहिल्या फेरीत 4 हजार हून अधिक मताधिक्य मिळवणाऱ्...

‘सह्याद्रि’साठी पी. डी. पाटील पॅनेललाच मताधिक्य - बाळासाहेब पाटील यांचा विश्वास

Image
मसूर : पी. डी. पॅनेलच्या सांगता सभेत सभासदांना मार्गदर्शन करताना बाळासाहेब पाटील, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर व सभासदांचा जनसमुदाय.  ‘सह्याद्रि’साठी पी. डी. पाटील पॅनेललाच मताधिक्य - बाळासाहेब पाटील यांचा विश्वास खाजगी कारखानदारांकडून होणारी बदनामी सभासद खपवून घेणार नाहीत कराड, दि. 4 (प्रतिनिधी)  - सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आपण संपूर्ण कार्यक्षेत्रातील सभासदांना भेटलो. यावेळी चारही तालुक्यात चांगले वातावरण असल्याचे दिसून आले. सभासदांनीही त्याबाबत विश्वास दिला. त्यामुळे विरोधकांची दोन पॅनेल आणि अपक्ष उमेदवारांच्या मतांच्या बेरजेपेक्षा जास्त मतदान पी. डी. पाटील पॅनेलला होईल, असा विश्वास माजी सहकार मंत्री व कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. मसूर (ता. कराड) येथे पी. डी. पॅनेलच्या सांगता सभेत सभासदांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद पंडीतराव जगदाळे होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, कराड उत्तरचे अध्यक्ष देवराज पाटील, शहाजी क्षिरसागर, राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस अजितराव पाटील-चिखलीकर, माजी सभ...

रस्ते विकासासह पायाभूत सुविधांसाठी सदैव प्रयत्नशील : आ. डॉ. अतुलबाबा भोसले

Image
नांदगाव : रस्ते विकासकामाचे भूमिपूजन व उद्‌घाटन करताना आ. डॉ. अतुलबाबा भोसले. रस्ते विकासासह पायाभूत सुविधांसाठी सदैव प्रयत्नशील : आ. डॉ. अतुलबाबा भोसले नांदगाव येथे रस्ते विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन कराड, दि. 2 - ग्रामीण भागाच्या प्रगतीत रस्ते विकास महत्वाचा असतो. रस्ते विकासासह उत्तम पायाभूत सुविधा हा नागरिकांचा हक्क आहे आणि तो मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले. नांदगाव (ता. कराड) येथे रस्ते विकासकामांच्या भूमिपूजन व उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.  भाजपा – महायुती सरकारच्या माध्यमातून आणि आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून नांदगाव ते संजयनगर - रेणुका माता मंदिर रोडसाठी ८० लाख आणि नांदगाव (पेठभाग) येथील मुक्तेश्वरनगर रस्ता काँक्रीटीकरणासाठी १० लाख असा एकूण ९० लाखांचा निधी मंजूर झाला आह. या रस्ते विकासकामाचे भूमिपूजन व उद्‌घाटन आ. डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते वि. तु. सुकरे गुरुजी होते. याप्रसंगी बोलताना आ. डॉ. भोसले म्हणाले, की नांदगाव ते संजयन...

सह्याद्रिच्या सभासदांचा पी.डी.पाटील पॅनलवर विश्वास - बाळासाहेब पाटील

Image
सह्याद्रिच्या सभासदांचा पी.डी.पाटील पॅनलवर विश्वास - बाळासाहेब पाटील  कराड, दि. 2 - गेली अनेक वर्षे सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने गळीतास आलेल्या ऊसास उच्चतम दर देऊन, ऊस बिले वेळेत शेतकऱ्यांना अदा केली आहेत, काट्यामध्ये अचूकता आहे त्यामुळे सह्याद्रिच्या सभासदांचा पी.डी.पाटील पॅनलवर विश्वास आहे असे मत चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी केले.  सैदापुर ता.कराड येथील सभासदांच्या संवाद बैठकी प्रसंगी ते बोलत होते. बैठकीस राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस अजितराव पाटील चिखलीकर, जयंत काका पाटील, शंकरराव खापे, ॲड. संजय जगदाळे, रामदास पवार, बाळासाहेब सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. चेअरमन बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील अनेक नेते मंडळींकडून आपल्या पी डी पाटील पॅनलला पाठिंबा मिळत आहे, यावरून सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर असणारी विश्वासार्हता सिद्ध होते. कारखान्याने नेहमीच उच्च दराची परंपरा कायम ठेवली आहे त्याचबरोबर वेळेत बिले अदा करण्यामुळे आपल्या पी डी पाटील पॅनलवर सभासदांचा विश्वास आहे. अजितराव पाटील म्हणाले, ग...

आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कोयना पुलासाठी ५० कोटींचा निधी मंजूर

Image
  आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कोयना पुलासाठी ५० कोटींचा निधी मंजूर जुन्या ब्रिटिशकालीन कोयना पुलाच्या जागी उभारला जाणार नवा चौपदरी पूल कराड, दि. 2 (वार्ताहर) - कराड येथे ब्रिटीशांनी उभारलेल्या जुन्या कोयना पुलाला तब्बल १५४ वर्षे पूर्ण झाली आहेत. कराडला पुणे-बेंगलोर महामार्गाशी जोडण्याचे काम हा पूल दीर्घकाळापासून करत आहे. सध्या हा पूल केवळ हलक्या वाहनांसाठी खुला आहे. त्यामुळे शहरात येण्यासाठी मुख्य महामार्गावरून मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे या जुन्या कोयना पुलाच्या जागी नवा चौपदरी पूल उभारण्यासाठी केंद्र सरकारच्या सी.आर.आय.एफ. फंडांतर्गत ५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे हा पूल झाल्यानंतर वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.  स्वातंत्र्यपूर्वकाळात ब्रिटिश राजवटीत सन १८७१ च्या सुमारास जुन्या कोयना पुलाची उभारणी करण्यात आली. कराड शहराला विविध बाजूंनी जोडणारा दुवा म्हणून या पुलाची ओळख आहे. कराड परिसरातील सर्वांत पहिला लोखंडी व दगडी बांधकाम असणारा हा पूल कमानी स्वरूपाचा असल्याने त्याची वेगळी ओळख आहे...

कराडचे कार्यमुक्त व फरार मुख्याधिकारी शंकर खंदारे यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर

Image
  कराडचे कार्यमुक्त व फरार मुख्याधिकारी शंकर खंदारे यांचा अटकपूर्व जामीन कराड कोर्टाकडून नामंजूर कराड दि. 1 (वार्ताहर) - लाच लचपत विभागाने कराड नगरपरिषदेच्या बांधकाम व नगर रचना विभागात छापा टाकून कारवाई केल्याप्रकरणी कराड नगर परिषदेचे कार्यमक्त मुख्याधिकारी शंकर खंदारे फरार झाले होते. या प्रकरणात इतर तीन जणांना अटक करण्यात आली होती. तर अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी शंकर खंदारे यांनी येथील न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता तो अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी पतंगे यांनी नामंजूर केला. कराड शहर पो स्टे अंतर्गत पोलीस उप अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी केलेल्या सापळा कारवाईत यातील तक्रारदार हर्षद दत्तात्रय बदामी बांधकाम व्यवसाईक यांचे मालकीचे कराड शहरातील सि. स. क. ७९, सोमवार पेठ, कराड येथील जागेत पार्किंग अधिक पाच मजली इमारतीचे पुनर्विकास बांधकामाचे प्रस्तावित काम मंजुर करून देणेसाठी आरोपी लोकसेवक शंकर खंदारे तत्कालीन मुख्याधिकारी, नगरपरिषद, कराड वर्ग १ यांना दि. दि. २०/०३/२०२५ रोजी मुख्याधिकारी नगरपरिषद कराड या पदावरून कार्यमुक्त केले असताना देख...

ऐतिहासिक उच्चांकी व्यवसायवृद्धीसह कराड अर्बनने व्यवसायाचा रु.५८०० कोटींचा टप्पा ओलांडला - डॉ. सुभाष एरम

Image
  ऐतिहासिक उच्चांकी व्यवसायवृद्धीसह कराड अर्बनने व्यवसायाचा रु.५८०० कोटींचा टप्पा ओलांडला - डॉ. सुभाष एरम कराड, दि. 1 - गतवर्षाच्या तुलनेत व्यवसायामध्ये जवळपास रु.६५० कोटींची विक्रमी वाढ नोंदवित कराड अर्बन बँकेने मार्च २०२५ अखेर रू.५८३७ कोटींची व्यवसायपूर्ती केली असून नेट एन.पी.ए.चे प्रमाणदेखील 'शून्य' टक्के राखत यशाची ऐतिहासिक परंपरा कायम ठेवली आहे. बँक मोबाईल बँकिंग व यूपीआय सेवांच्या प्लॅटफार्मवर येत असतानाच सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी बँकेने गुढीपाडव्याच्या सुमूहूर्तावर 'सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर'चा शुभारंभ केला आहे. कोणत्याही प्रकारच्या सायबर हल्ल्यांना रोखण्यास सक्षम असणारे हे अद्ययावत व रिअल टाईम मॉनिटरिंग करणारे पश्चिम महाराष्ट्रातील पहिलेच सेंटर असून यामुळे ग्राहकांच्या सर्व आर्थिक व्यवहारांना सुरक्षिततेचे कवच लाभले आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. मार्च २०२४ मध्ये बँकेने रु.५००० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा ओलांडला होता आणि मोबाईल बँकिंग व यू.पी.आय. सेवा सुरू करण्याचा संकल्प करीत नव्या आर्थि...