कराड मध्ये लोकनेते स्व. विलासराव पाटील- उंडाळकर यांना अभिवादन...
कराड मध्ये लोकनेते स्व. विलासराव पाटील- उंडाळकर यांना अभिवादन...
कराड दि. 4 (प्रतिनिधी) - माजी सहकार मंत्री लोकनेते स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त कोयना सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातील काकांच्या पुतळ्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. मनोज घोरपडे, अॅड. उदयसिंह पाटील यांनी पुष्पचक्र अर्पन करून अभिवादन केले.
यावेळी बोलताना रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील यांनी १९६७ पासून कराड तालुक्यात सामान्य माणसांची अभेद्य संघटना उभारणेचे काम केले. सामान्य माणूस राजकारणापासून अलिप्त राहिला तर अवैध्य मार्गाने पैसे मिळवलेले धनिक सत्तेत जातील या जाणिवेतून कराड दक्षिण, उत्तर, पाटण असा भेदभाव न करता सातारा जिल्हा बँक, कराड बाजार समिती, स्थानिक स्वराज्य संस्था या सह सर्व संस्थामधून सामान्य माणसाच्या विकासासाठी सर्वसामान्य माणसाला सत्तेत बसवून ख-या अर्थाची सामाजिक क्रांती घडवली. त्याचबरोबर कराड दक्षिणच्या डोंगरी भागातील जनतेला लागणा-या मानवी व आरोग्याच्या सोई सुविधा पुरविण्याचे काम केले. स्व. विलासकाकांच्या कामाचा आदर्श घेणे ही आज काळाची गरज आहे.
यवेळी कोयना सहकारी बँकेचे चेअरमन रोहित पाटील, व्हा. चेअरमन विजय मुठेकर, सातारा, मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, अनिल मोहिते, जगन्नाथ मोरे, लक्ष्मण देसाई, महेशकुमार जाधव, अजित पाटील, जयवंत शिबे , भाऊसो मंडले, नितीन ढापरे, सतिश इंगवले, राजेंद्र चव्हाण, संभाजी चव्हाण, गणपत पाटील, जे बी लावंड, चतुरदास पटेल, विजयकुमार कदम, रंगराव थोरात, ऍड. लोकरे, तुकाराम काकडे, नितीन थोरात, अजित केंजळे तसेच कोयना बँकेचे अधिकारी, सेवक वर्ग उपस्थित होते.

Comments
Post a Comment