शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; प्रा. उमा पाटील
११ जानेवारी रोजी विविध क्षेत्रातील 150 नामांकित कंपन्या उपस्थित राहणार
कराड, दि 7 - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड व केंद्रीय संस्था शिक्षता प्रशिक्षण मंडळ संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळावा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक दायित्वाची भावना जपत ११ जानेवारी २०२५ रोजी हा उपक्रम राबवत आसल्याची माहिती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डीन प्रा. उमा पाटील यांनी पत्ररकार परिषदे षदिली. यावेळी प्रा. पौर्णिमा कावलकर, प्रा. यादव व प्रा. गायकवाड उपस्थित होते
या मेळाव्याबद्दल अधिक माहिती देताना त्यापुढे म्हणाले की, या मेळाव्यात BE/ BTech/ Diploma/ BPharm/ ITI/ BSc/ BCS/ BA/ BCom/ BBA आणि इतर विविध अभ्यासक्रमांच्या टेक्निकल, नॉन टेक्निकल विद्यार्थ्यांसाठी १२५ पेक्षा जास्त विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये ८५०० पेक्षा जास्त देशात व परदेशात रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.
या रोजगार मेळाव्याचे आयोजन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड व केंद्रीय संस्था शिक्षुता प्रशिक्षण मंडळ (BOAT) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात ७५ लाख रोजगार निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रेरणेने आणि "स्किल इंडिया" योजनेच्या अंतर्गत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात राज्यातील सर्व पदवी, पदविका, ITI, BA, Bcom, Bsc, BBA, Bcs फार्मसी टेक्निकल तसेच नॉन-टेक्निकल विद्यार्थ्यांसाठी रोजगार संधी उपलब्ध असणार आहेत. १२५ पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांमध्ये विविध क्षेत्रांतील नोक-यांसाठी ८५०० पेक्षा जास्त रोजगार संधी उपलब्ध असणार आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींनी या मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. विनामूल्य नोंदणी असून इच्छुक विद्यार्थ्यांनी दिलेल्या लिंक वेबसाईट व संपर्क क्रमांकावर नोंदणी करावी असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्याचे आयोजन मुख्यतः राज्यातील शेती, बांधकाम, वाहतूक, पर्यटन या व्यवसायातील वाढती उलाढाल व वाढती औद्यो गिक गुंतवणूक यामधून विविध क्षेत्रातील नामंकित कंपन्यांमधील सेवा क्षेत्रातील निर्माण झालेल्या रोजगार संधींचा लाभ अधिकाधिक राज्यातील ग्रामीण शहरी, निम शहरी सर्व पात्र युवक युवती मिळावा आणि त्यांना त्यांच्या करिअर ची सुरुवात नामांकित कंपनी मधून सुरू करण्याची संधी मिळावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विविध योजना द्वारे सर्व क्षेत्रात रोजगार निर्माण होत आहेत याचा फायदा राज्यातील युवक युवती यांना होईल व या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन युवक-युवती यांच्या करिअर ची सुरुवात योग्य दिशेने होऊ शकेल.
रोजगार मेळाव्यासाठी अधिक माहिती आणि नोंदणीसाठी कृपया खालील संपर्क विवरणावर संपर्क साधाःसंपर्क व्यक्तीः प्रा. उमा पाटील, प्रा. पौर्णिमा कावलकर - फोन नंबर: 9860867021, 8108322003, ईमेल: gcekjobfair@gmail.com - वेबसाइट: https://gcekarad.ac.in/general/JOB-FAIR-2025 या मेळाव्यात सहभागी होऊन आपल्या भविष्याला आकार देण्यासाठी नोंदणी करा, आपल्या करिअरला एक नवा आयाम देण्यासाठी या रोजगार संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment