कराडात आस्था सामाजिक संस्थेकडून पत्रकारांचा सन्मान...
कराडात आस्था सामाजिक संस्थेकडून पत्रकारांचा सन्मान...
पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा - सौ. स्वाती पिसाळ
कराड, दि. 7 - आस्था संस्था गेली आठ वर्ष कार्यरत असून संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्या उपक्रमांना समाजातील प्रत्येक लोकांच्या पर्यंत पोहचवण्याचे काम पत्रकार करत असतात. समाजातील कटू सत्य निर्भीड पणे मांडताना पत्रकारांना अनेक समस्यांना सामोरी जावे लागते, तरीपण न थांबता अहोरात्र ते काम करत असतात. पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा असून या आरशात आपण दररोज सकाळी आपला चेहरा बघत असतो. कुणाला गोड बरं वाटावं म्हणून लिहण्यापेक्षा जे सत्य आहे ते लिहिण्याची काम ते करत असतात त्यामुळेच सत्यमेव जयते हे आपले ब्रीदवाक्य कुणी विसरू नये असे मत आस्था सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. स्वाती पिसाळ यांनी व्यक्त केले.
पत्रकार दिनानिमित्त येथील शासकीय विश्रामगृहात शहरातील पत्रकारांचा आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सौ पिसाळ बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे उपाध्यक्ष मुकुंद उर्फ शार्दूल चरेगावकर व प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्षा डॉ. सौ. सारिका गावडे या उपस्थित होत्या.
यावेळी कार्यक्रमात पत्रकारांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, डायरी, पेन व रोपटे तसेच होमिओपॅथी औषधे देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास संचालिका सौ शुभांगी देशमुख, सौ. राधिका पन्हाळे, सौ. सुरेखा माने, सौ. सुरेखा सूर्यंवशी, सौ. रुपाली मुंडेकर, सौ. सुषमा मोटे, सौ. लताताई भोसले, सौ. कविता पवार इ. महिला मान्यवर उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्राध्यापक तडाखे सर यांनी केले. मुळे सरांनी आभार व्यक्त केले.


Comments
Post a Comment