विरोधकांनी या भागातील एकाही युवकाला काम दिले नाही : डॉ. अतुल भोसले

कासारशिरंबे : येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत बोलताना भाजपा-महायुतीचे कराड दक्षिणमधील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले.

विरोधकांनी या भागातील एकाही युवकाला काम दिले नाही : डॉ. अतुल भोसले

कासारशिरंबेतील जाहीर प्रचार सभेला मतदारांचा उदंड प्रतिसाद

वाठार दि. 9 (वार्ताहर) गेल्या दहा वर्षात विरोधकांनी या भागातील एकाही युवकाला काम दिले नाही. कराडच्या एम.आय.डी.सी.मध्ये ते नवीन उद्योग आणून रोजगार उपलब्ध करु शकले नाहीत. गेली २ पिढ्या सत्तेत असूनही रोजगार निर्मिती करू न शकणारे विरोधक आपल्या भावी पिढीचे काय भले करणार, असा सवाल भाजपा-महायुतीचे कराड दक्षिणमधील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केला. कासारशिरंबे (ता. कराड) येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी धोंडीराम पाटील होते.

याप्रसंगी व्यासपीठावर सरपंच श्री. उमेश पवार, उपसरपंच संतोषराव यादव, सुदन मोहिते, माजी सरपंच बाबुराव यादव, कृष्णा बँकेचे संचालक संतोष पाटील, बाजार समितीचे माजी संचालक मिलींद पाटणकर, तानाजी यादव, ग्रामपंचायत सदस्य अमर पाटील, संजय यादव, बनकरराव पवार, बाबुराव माने, एकनाथ गायकवाड, राजाराम माने, भानुदास कचरे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. अतुलबाबांच्या कासारशिरंबे येथील जाहीर सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी मतदारांशी संवाद साधताना डॉ. अतुलबाबा भोसले पुढे म्हणाले, की विद्यमान लोकप्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षात आपल्या मतदारसंघात येऊन कितीवेळा लोकांची विचारपूस केली? विरोधकांच्या व्यासपीठावरुन सतत माझ्या माताभगिनींचा अपमान होतोय, पण विद्यमान लोकप्रतिनिधी त्याबद्दल अवाक्षरही काढत नाहीत, याचे मला वाईट वाटते. दरवेळेप्रमाणे यावेळेलाही विरोधकांकडून कृष्णा कारखाना, कृष्णा हॉस्पिटल, चॅरिटेबल ट्रस्टबाबत टीका होत आहे. पण लोकसुद्धा विरोधकांच्या या टिकेला आता कंटाळले आहेत.

याउलट आम्ही सदैव विकासाची कास धरुन कराड दक्षिणमध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी आणला. कृष्णा समूहाच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, रोजगारनिर्मितीसाठी मोठे काम सुरु आहे. शिरवळ येथे लवकरच कृष्णा विश्व विद्यापीठाची नवी शाखा सुरू होत असून, दोन वर्षात हा प्रकल्प उभा करून मतदारसंघातील अडीच हजार तरुणांना याठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्याचा आमचा मानस आहे. शासनाच्या लाडकी बहिण योजना, बांधकाम कामगार योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी मी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी, भावांनी तसेच ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिकांनी मला भरघोस मतांचा आशीर्वाद देऊन, आपली सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक