आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून स्व. यशवंतराव मोहिते यांना अभिवादन

रेठरे बुद्रुक : येथे (स्व.) यशवंतराव मोहिते यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना आ. पृथ्वीराज चव्हाण, समवेत इतर मान्यवर

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून (स्व.) यशवंतराव मोहिते यांना अभिवादन

कराड दि.7: राज्याचे ज्येष्ठ विचारवंत व माजी मंत्री (स्व.) यशवंतराव मोहिते यांनी आयुष्यभर पुरोगामी आणि डावा विचार जपला. त्यांचे कार्य आणि विचार जोपासण्याचे काम त्यांची पुढील पिढी करत आहे. त्यांच्या पिढीचा आदर्श आजकालच्या राजकीय गोंधळातील परिस्थितीत महत्वाचा ठरतो. असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

रेठरे बुद्रुक येथील ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांच्या निवासस्थानी आ. चव्हाण यांनी (स्व.) यशवंतराव मोहिते यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते. भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, डॉ. विश्र्वेंद्र मोहिते, अॅ ड. नरेंद्र नांगरे - पाटील, युवा नेते इंद्रजित चव्हाण, शिवाजीराव मोहिते, देवदास माने, अधिकराव गरुड, सुभाषराव पाटील, शिवराज मोहिते, रंगराव मोहिते, जगदीश मोहिते, लालासाहेब थोरात, बबन सुतार, सनी मोहिते, दिग्विजय पाटील, अभिजित सोमदे, विकास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी आ. चव्हाण यांनी (स्व.) मोहिते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी यशवंतराव मोहिते यांच्या आठवणींना उजाळा देत डॉ. इंद्रजित मोहिते व विश्वेंद्र मोहिते यांच्याशी चर्चा केली. 


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक