महाराष्ट्र शासनाकडून कराडच्या आयटीआय कॉलेजचे नामकरण.....

 


महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांना मिळाली नवी ओळख...

कराडच्या आयटीआय कॉलेज आता सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कराड...

सातारा दि.7: कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांचे यशस्वी नामकरण करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. त्यानंतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील ५ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे. यामध्ये कराडच्या आयटीआय कॉलेजचाही समावेश असून आता या कॉलेजचे सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे करण्यात आले आहे.

याबाबत मंत्री लोढा म्हणाले की, "औद्योगिक संस्थांचे नामकरण हा केवळ एक निर्णय नसून, महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या संस्थांना आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या नावाने ओळख मिळाल्याने या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची शिकवण व प्रेरणा मिळेल. युवकांचा कौशल्य विकास हे राज्याच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे आणि या नावांमुळे प्रत्येक प्रशिक्षणार्थीला आपल्या कार्यात सामाजिक जबाबदारीची जाणीव होईल. हा उपक्रम नव्या पिढीला त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी प्रेरणा देईल आणि त्यांच्या मेहनतीला एक दिशा देईल."

नामकरण केलेल्या संस्थांची माहिती पुढीलप्रमाणे,

१. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मेधा (जावळी), जि. सातारा- वीर जीवा महाले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मेधा (जावळी), जि. सातारा

२. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कराड, जि. सातारा - सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कराड, जि. सातारा

३. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातारा, जि. सातारा- समर्थ रामदास स्वामी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातारा, जि. सातारा

४. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध खटाव, जि. सातारा - लक्ष्मणराव इनामदार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध खटाव, जि. सातारा

५. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाटण, जि. सातारा - वत्सलादेवी देसाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाटण, जि. सातारा

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक