कराड शहरातील वाढीव भागात अतुल भोसले यांचा प्रचार

 


वाढीव भागातील नागरिक अतुल भोसले यांच्या पाठीशी....

कराड, दि.31 : ज्यांना आम्ही आमदार म्हणून निवडून दिले, ते इकडे कधी फिरकलेच नाहीत अशी टीका आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर करत, कराड शहरातील वाढीव भागातील स्थानिक नागरिकांनी या परिसरातील समस्यांचा पाढा भाजपा – महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासमोर वाचून दाखविला. आमची मते घेऊन, नंतर ढुंकुनही न पाहणाऱ्या आमदाराला या निवडणुकीत धडा शिकविणार असल्याचे सांगून, वाढीव भागात येऊन आमच्या समस्या जाणून घेणाऱ्या आणि त्या सोडविण्यासाठी तत्परता दाखविणाऱ्या डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याच पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला.

कराड शहरातील वाढीव भागातील दौलतनगर कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, मुजावर कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा पूर्व भाग, धाराशिव वसाहत, शिक्षक कॉलनी, सूर्यवंशी मळा, अष्टविनायक कॉलनी या परिसरात डॉ. अतुलबाबा भोसले यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून, या भागातील समस्या जाणून घेतल्या. यावेळी स्थानिकांनी विद्यमान आमदारांवर टीकेची झोड उठवत, ज्यांना आमदार म्हणून निवडून दिले ते लोकप्रतिनिधी इकडे कधी फिरकलेच नाहीत, अशी टीका करत या भागातील गैरसोयींचा व समस्यांचा पाढा वाचून दाखविला.

यावेळी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, कराड शहराचा वाढीव भाग विकासापासून पूर्णपणे वंचित राहिला आहे. गेल्या ६० वर्षांत या भागात रस्ताच झालेला नसेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे. या भागात सामान्य कष्टकरी जनता राहते. त्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी मी विशेष प्रयत्नशील आहे. तसेच येत्या काळात या भागातील रस्ते, गटर्स, पाण्यासह सर्वप्रकारच्या नागरी सुविधा देण्यासाठी मी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असून, कराडमधील वाढीव भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटीबद्ध राहीन. आपण संधी दिली तर या भागाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, असे अभिवचन मी देतो.

यावेळी शिवराज इंगवले, डॉ. राजेंद्र कंटक, विक्रांत देशमुख, सागर धावणे, विकास भुजंगे, राहुल सूर्यवंशी, अशोक पवार, शशिकांत होगडे, अमोल कांबळे, मुनाफ सय्यद यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कराड : कराड शहरातील वाढीव भागातील नागरिकांशी संवाद साधताना भाजपा – महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक