तीन कोटी लुटीचा गुन्हा उघड; १० आरोपींना मुद्देमलासह अटक

 


कराड शहर पोलीस ठाणे पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची दमदार कामगिरी 24 तासामध्ये दरोड्याचा गंभीर गुन्हा उघड करुन गुन्हयातील रोख रक्कम 2,89,34,000/- रुपये हस्तगत व 10 आरोपी यांना केली अटक

कराड दि.19 मुंबईहून हुबळी कडे तीन कोटी रुपयांची रक्कम घेऊन निघालेल्या कारला मलकापूर हद्दीत गाडी आडवी मारून अज्ञात इसमानी रक्कम लुटले ची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेत कराड शहर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेने गतीने तपास करून 24 तासात हा गुन्हा उघडकीस आणला असून दोन कोटी 89 लाख 34 हजार रुपये हस्तगत करत दहा आरोपींना अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

15 ऑक्टोंबर रोजी सुमारास यातील फिर्यादी मुंबई पार्टीचे 3 कोटी रुपये रोख रक्कम क्रेटा गाडी MH12 ML6005 मधुन घेवुन मुंबई ते हुबळी अशी घेवुन जात असताना कराड मलकापूर नजीक गाडी आडवी मारुन कार मधून दोन अनोळखी मुले खाली उतरली तसेच दुचाकी मोटार सायकलवरून आणखी दोन अनोळखी इसम असे उतरले. त्यापैकी एकाने हॉकीस्टिकने क्लिनर साईटची काच फोडली. तसेच स्विप्ट गाडीतील दोन इसमांनी गाडीचा दरवाजा उघडुन " गाडी का दाबली असे म्हणुन शिवीगाळ व मारहाण करु. लागले. त्यापैकी एकाने मला हाताने लाथाबुक्याने मारहाण करून ड्रायव्हर सिट जवळील मोकळ्या जागेमधुन मला मागे। ढकलुन दिले. उर्वरित दोन इसमांनी अविनाश यास मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली. त्यानंतर आमची गाडी जबरदस्तीने घेवुन जावुन एकाने चाकुचा धाक दाखवुन तुम्ही काय काम करता, गाडी कचरापेटीच्या जवळ भरता, आम्हाला तुमच्या बद्दल सर्व माहीती आहे. तुमच्या जवळ काय आहे तुम्ही ते काढुन द्या नाहीतर आमचे आम्ही काढल तर तुम्ही एक सुध्दा जिवंत राहणार नाही तुम्हाला जिवे ठार मारून टाकतो असे म्हणुन आम्हाला मारहाण करून गाडी गमेवाडी घाटामध्ये थांबवुन आमचेजवळ असणारी 3 कोटी रुपये एवढी रोख रक्कम ही आम्ही भितीपोटी त्यांना काढुन दिली. त्यानंतर त्यांनी आमचे डोळ्यावर रुमाल बांधला व गाडी थोडे पुढे घेवुन गेले. व आमचे गाडीतील रक्कम दुसरे एका चारचाकी गाडीत ठेवली ती गाडी तेथुन निघुन गेली. त्यानंतर आमची गाडी डी मार्ट मॉलचे पुढील बाजुस असणारे नांदलापुर गावाजवळ रोडवर त्यानंतर आमची गाडी डी मार्ट मॉलचे पुढील बाजुस असणारे नांदलापुर गावाजवळ रोडवर हायवेवर त्यांनी थांबवली. व त्यानंतर ते सर्व निघुन गेले. तसेच आम्हाला तुम्ही येथून सरळ पुढे कोल्हापुर कडे 20 कि.मी जायचे थांबायचे नाही, नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे म्हणुन ते तेथुन निघुन गेले म्हणुन माझी वरील अज्ञात 5 इसमाचे विरुध्द कायदेशिर तक्रार आहे. म्हणुन वगैरे मजकुराची खबरीवरुन कराड शहर पोलीस ठाणे 1375/2024 भा.न्या.खूं.का. 2023 कलम 311,140 (1), 324(4) प्रमाणे दिनांक 16/10/2024 रोजी दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.ए. ताशिलदार हे करत होते. सदर गुन्हयाचे तपासामध्ये मोबाईल नंबरचे विश्लेषण करुन त्यामधिल संपर्क करणारे मोबाईल नंबरचे बाबत साक्षीदार यांचे कडे अधिक कसोशीने चौकशी केली असता यामध्ये गुन्हयामध्ये खालील प्रमाणे आरोपी 1. आसिफ सलिम शेख रा. शिंदे गल्ली कराड 2. सुलताना शकील सय्यद वय 45 रा. मंगळवार पेठ करडी पीराजवळ कराड, 3.अजमेर ऊर्फ अज्जु मोहम्मद मांगलेकर वय 36 वर्षे रा. अष्टमंगलकार्यालय समोर, गोळेश्वर कार्वेनाका कराड, 4. नजर महम्मद आरीफ मुल्ला वय 33 वर्षे रा. 262 रविवारपेठ कराड, 5. ऋतुराज धनाजी खंडग वय 29 वर्षे रा. तांबवे ता. कराड, 6. ऋषिकेश धनाजी खंडग वय 26 वर्षे रा. तांबवे ता. कराड, 7. करीम अजीज शेख वय 35 वर्षे रा. 192 मंगळवारपेठ कराड, 8. अक्षय अशोक शिंदे वय 29 वर्षे रा. तामजाई गल्ली तांबवे ता. कराड, 9. नजीर बालेखान मुल्ला वय 33 वर्षे रा. राजीवनगर सैदापुर कराड ता. कराड 10. शैलेश शिवाजी घाडगे वय 24वर्षे, रा. निमासोड ता. खटाव, 11. अविनाश संजय घाडगे वय 29 वर्षे रा. निमासोड ता. खटाव हे आरोपी निष्पन्न करुन नमुद आरोपी यांचे कडुन गुन्हयातील जबरी चोरी केलेली रक्मम 2,89,34,000/- हजार रुपये एवढी रक्कम आज पावेतो हस्तगत करण्यात आली असुन आरोपी यांनी वापरलेले वाहने स्विफ्ट गाडी, इनोव्हा, सियाज तसेच HF डिलक्स, जुपीटर, अशी जप्त करण्यात आलेली आहेत. नमुद आरोपी यांची दिनांक 22/10/2024 रोजी पर्यंत पोलीस अभिरक्षा मंजुर करण्यात आलेली असुन सदर आरोपी यांचे कडे तपास सुरु आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक, अमोल ठाकुर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड, आर.ए. ताशिलदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड, अरुण देवकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बधे, सपोनि फारणे, सपोनि. तारु, सपोनि भापकर, सपोनि, माळी, मसपोनि जाधव, मसपोनि आवंले, मसपोनि, वाघमोडे, मपोउपनि. शितल माने, पोलीस उपनिरीक्षक, शिगाडे, डिसले, पोउपनि भंडारे, पोउपनि मगदुम, अशोक वाडकर, अमोल सांळुखे, सपना सांळुखे, राजेद्र गायकवाड, मपोहवा पुष्पा चव्हाण, पोलीस नाईक अनिल स्वामी, संदीप कुभार, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, पो.शि. संदीप शेडगे, आनंदा जाधव, धीरज कोरडे, महेश शिंदे, अमोल देशमुख, दिग्विजय सांडगे, मोहसिन मोमिन, संग्राम पाटील, सागर भोसले, विजय गुरव, दिपक सांळुखे, आकाश मुळे, अमित चव्हाण, संजय गायकवाड कपील आगलावे, शितल गवळी, महिला पोलीस सोनाली पिसाळ, स्थागुशा सातारा यांचे कडील शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, गणेश कापरे, मुनीर मुल्ल्ला, लक्ष्मण जगधने अमित माने, मोहन पवार, स्वप्नील दौंड, शिवाजी भिसे, स्वप्नील कुंभार, शिवाजी गुरव, पृथ्वीराज जाधव, पंकज बेचके, यांनी सदरची कारवाई केलेली आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक