कराडत तीन कोटीच्या लूटप्रकरणी शहरातील दहा आरोपीना अटक


कराडात तीन कोटीच्या लूटप्रकरणी शहरातील दहा जण अटकेत...

दहा जणांना सहा दिवस पोलीस कोठडी;निम्मा मुद्देमाल हस्तगत

कराड, दि. 17 (प्रतिनिधी) मुंबईहून हुबळी येथे तीन कोटी रुपयांची रक्कम घेऊन जाणाऱ्या कारला अडवून तीन कोटीची लूट केल्याप्रकरणी पोलिसांनी शहरातील आठ ते नऊ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून लुटलेली रक्कम हस्तगत केली आहे. लुटलेली रक्कम कराड शहरातील काही बहाद्दरांकडे देण्यात आली होती. मात्र हे बहाद्दर पोलिसांच्या रडारवर आल्याने पोलिसांनी त्यांना तात्काळ बेड्या घालत त्यांच्याकडील रक्कम हस्तगत केली आहे. उद्या या घटनेचा पूर्णपणे खुलासा होणार आहे. या प्रकरणात फिर्यादीचा आरोपी झाल्याचे स्पष्ट होत आले आहे.

तीन कोटी रुपयांची लूट केल्यानंतर संबंधितांनी सदर रक्कम आपआपसात वाटून घेतली. कोणाला पाच लाख दिले. कोणाला दहा लाख दिले. कोणाला पन्नास लाख दिले. कोणाला पंचवीस लाख दिले. आणि हीच रक्कम घेणारे कराड शहरातील काही बहाद्दर पोलिसांच्या रडारवर आले. यातील काही नग रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत तर काही जणांनी नुकताच अशा या क्षेत्रात प्रवेश केलेला आहे. पोलिसांनी ज्यावेळेस या नगांची धरपकड केली त्यावेळी संपूर्ण शहरात खळबळ मजली असून अनेक जण या लुटीच्या प्रकरणावर खमंग चर्चा करू लागले आहेत.

कराड शहर पोलीस व गुन्हे प्रकटीकरण शाखेने शहर व परिसरातील दहा जणांना अटक केली असून लुटलेला निम्मा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक केलेल्या दहा जणांना सहा दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तासिलदार यांनी दिली 

मंगळवारी मध्यरात्री शहरा नजीकच्या मलकापूर फाट्यावर कार आडवून कार मधील रोख रक्कम लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीस दोन संशयताना ताब्यात घेतल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस व गुन्हे प्रकटीकरण शाखेने अधिकचा तपास करून कराड शहर व परिसरात तील 10 संशयतांना ताब्यात घेत अटक केली असून त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेतील अर्धी रक्कम हस्तगत केली आहे. आज या अटक केलेल्या दहा जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

विंग तालुका कराड येथील अवधूत कणसे यांच्या क्रेटा गाडी एम एच 12 एम एल 6005 या गाडीवर ड्रायव्हर असणारे शैलेश घाडगे व अविनाश घाडगे हे कणसे यांच्या सांगण्यावरून मुंबई येथील एका पार्टीचे तीन कोटी रुपये रोख रक्कम घेऊन क्रेटा गाडीतून हुबळीकडे निघाले होते. यावेळी अज्ञातानी मलकापूर गावच्या हद्दीत गाडी अडवून गाडीतील रक्कम लुटली होती. 

याप्रकरणी कराड पोलिसांना आणखी काही संशितांचा या लूटप्रकरणी हात असल्याची माहिती मिळाली असून आणखी काही जणांचा यामध्ये सहभाग असल्याने पोलिसांनी याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. उद्या या लूट प्रकरणातील संपूर्ण माहिती दिली जाणार असल्याचे या घटनेचा तपास करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तासिलदार यांनी सांगितले

____________________

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क

राजू सनदी, कराड 

9822308552

rajusanadi@gmail.com

karadtoday@gmail.com


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक