पृथ्वीराज बाबांना 50 हजारांचे मताधिक्य देण्याचा कार्यकर्त्याचा निर्धार


पृथ्वीराज बाबांना 50 हजारांचे मताधिक्य देण्याचा कार्यकर्त्याचा निर्धार

पुढील 30 दिवस पृथ्वीराज चव्हाणांच्या विजयासाठी : कार्यकर्त्याचा निर्धार...

कराड दि. 20 - काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात कराड दक्षिण मतदार संघातून पृथ्वीराज चव्हाण यांना 50 हजाराच्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच पुढील 30 दिवस पृथ्वीराज चव्हाण यांच्या विजयासाठी असा निर्धार केला. 

कराड येथे विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव, फारूख पटवेकर, कराड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, अजितराव पाटील- चिखलीकर, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, मलकापूर नगरपरिषेदेच्या माजी नगराध्यक्षा निलम येडगे, जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्षा गितांजली थोरात, कोयना दूध संघाचे उपाध्यक्ष शिवाजी जाधव, बंडा नाना जगताप, नानासो पाटील, नरेंद्र पाटील, नितीन थोरात, डॉ सुधीर जगताप, निवासराव थोरात, पै. तानाजी चौरे, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, कराड दक्षिण युवक काँग्रेस अध्यक्ष दिग्विजय पाटील, नामदेवराव पाटील, शंकरराव खबाले, वैभव थोरात, संजय तडाखे, श्रीकांत मुळे, प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, गणेश गायकवाड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. 

फारूख पटवेकर म्हणाले, कराड शहरातून आम्ही जास्तीत जास्त मताधिक्य पृथ्वीराज बाबांना देऊ. कराडमध्ये कृष्णा कोयनेचा- संगम आहे, तसा पृथ्वीराज बाबा- उदय दादा यांचा संगम आहे. पृथ्वीराज बाबांनी जसे पहिल्यांदा मराठा समाजाला 16% आरक्षण दिले त्याचवेळी त्यांनी मुस्लिम समाजातील मागासवर्गीय घटकाला सुद्धा आरक्षण दिल होत. मात्र भाजप सरकारने ते दोन्ही आरक्षण घालवले. 

कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, जागेअभावी कार्यकर्ते जमिनीवरच बसले

कराड दक्षिण कार्यकर्ता मेळाव्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमस्थळी जागा कमी पडू लागल्याने कार्यकर्त्यांनी मांडी घालून जमिनीवर बसत भाषणे ऐकली. 

चचेगाव येथील आबा गुरव यांच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या विषयी दिलेल्या सोशल मीडियावरील व्हिडीओ लाखो लोकांनी पहिला आहे. गावठी भाषेत पृथ्वीराज चव्हाण यांचा विजय निश्चित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक