कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून 31 तर दक्षिण मधून 28 अर्ज दाखल

 

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून पै. संतोष वेताळ यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून 31 तर दक्षिण मधून 28 अर्ज दाखल

कराड उत्तर मध्ये 28 उमेदवार तर दक्षिण मध्ये 22 उमेदवार

कराड, दि. 29 (प्रतिनिधी) कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत तर आज अखेर या मतदारसंघातून 28 उमेदवारांनी 31 अर्ज दाखल केले आहेत. कराड दक्षिण मतदारसंघातून 9 उमेदवारांनी 12 दाखल केले आहेत तर आज अखेर या मतदारसंघातून 22 उमेदवारांनी 28 अर्ज दाखल केले आहेत. कराड उत्तर मधून 19 जणांनी अपक्ष तर कराड दक्षिण मधून 15 जणांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत

उद्या दिनांक 30 ऑक्टोंबर रोजी दाखल झालेल्या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे व विक्रांत चव्हाण यांनी दिली.

बाळासाहेब उर्फ शामराव पांडुरंग पाटील,पक्ष राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) रा.कराड यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून एकूण 2 अर्ज तर मनोज भिमराव घोरपडे, पक्ष (भाजप) रा.मत्यापूर, पोस्ट माझगाव, यांनी भा.ज.प कडून एकूण 3 अर्ज दाखल केली आहेत. जसराज शामराव पाटील, पक्ष राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) रा.कराड, अन्सारअली महमूद पटेल, पक्ष-वंचित बहुजन आघाडी (रा.वाघेरी), सोमनाथ रमेश चव्हाण, पक्ष-राष्ट्रीय समाज पक्ष (रा.कालगाव), राजेंद्र बापूराव निकम, पक्ष-राष्ट्रीय मराठा पार्टी रा.कोनजावडे, पोस्ट सावरघर, तालुका पाटण, सीमा सुनील पोतदार, पक्ष राष्ट्रीय स्वराज्य सेना, रा.पुसेसावळी, तालुका खटाव, सर्जेराव शामराव बनसोडे, पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रा. ओगले कॉलनी, विरवडे, ओगलेवाडी, श्रीपती कोंडीबा कांबळे, पक्ष- बहुजन समाज पार्टी, रा.आंबेडकरनगर, चिखली 

अपक्ष म्हणून महादेव दिनकर साळुंखे (रा.वराडे), सत्यवान गणपत कमाने रा.गोपुज, संतोष पांडुरंग वेताळ (रा.सुर्ली), रवींद्र भिकोबा सूर्यवंशी (रा.हेळगाव), रामचंद्र मारुती चव्हाण (रा.कामथी), इब्राहिम मेहमूद पटेल (रा.वाघेरी), बाळासो पांडुरंग पाटील रा.मळगे, पोस्ट मुरगुड, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर, बाळासो शिवाजी पाटील रा.चावडी जावळ, पोस्ट तूजारपुर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. अधिकराव दिनकर पवार (रा.गोटे), वैभव हणमंत पवार (रा. वहागाव), दिपक सुनिल कदम (रा.वारूंजी), वसीम मकबुल इनामदार रा. रिकिबदारवाडी, पोस्ट तारगाव, तालुका कोरेगाव, गणेश वसंत घोरपडे रा.वाठार किरोली, तालुका कोरेगाव, निवृत्ती केरु शिंदे रा.शाहूनगर गोडोली, तालुका सातारा, प्रशांत रघुनाथ कदम (रा.वडगाव), अजय महादेव सूर्यवंशी (रा.हजारमाची), शिवाजी अधिकराव चव्हाण रा. कोपर्डी हवेली, दत्तात्रय भिमराव भोसले-पाटील, (रा. खोडशी), रवींद्र दत्तात्रय निकम रा.खडकपेठ, मसूर यांनी अर्ज दाखल केले आहेत.

कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण (राष्ट्रीय काँग्रेस), अतुल सुरेश भोसले (भारतीय जनता पार्टी), सुरेश जयवंतराव भोसले (भारतीय जनता पार्टी), संजय कोंडीबा गाडे (वंचित बहुजन आघाडी), इंद्रजित अशोक गुजर (स्वाभिमानी शेतकरी संघटना), विद्याधर कृष्णा गायकवाड (बहुजन समाज पार्टी), मुकुंद निवृती माने (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)

अपक्ष म्हणून हमीद रहीम शेख, ऋषिकेश विजय जाधव, गोरख गणपती शिंदे, विश्वजीत अशोक पाटील, रविंद्र वसंतराव यादव, गणेश शिवाजी कापसे, प्रशांत रघुनाथ कदम, प्रकाश यशवंत पाटील, महेश राजकुमार जिरंगे, विजय नथुराम सोनावले, शमा रहीम शेख, शैलेंद्र नामदेव शेवाळे, चंद्रकांत भिमराव पवार, जनार्दन जयवंत देसाई, सुवर्णसिंह शंकरराव पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक