कराड शहरातील दोन महत्त्वपूर्ण कामासाठी 25 कोटींचा निधी मंजूर...


छ. संभाजी महाराज स्मारक व लिबर्टी साठी 25 कोटींचा निधी मंजूर...

कराड, दि. 15  (प्रतिनिधी)  शहरातील स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यासह लिबर्टी मजदूर मंडळाच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती स्मारक समितीचे संस्थापक सचिव रणजीत नाना पाटील व लिबर्टीच्या रमेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्मारक समिती व लिबर्टी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे विशेष सहकार्यातून व रणजीत पाटील नाना यांचे विशेष प्रयत्नातून कराड शरातील या दोन महत्वपूर्ण कामांसाठी 25 कोटी रुपये निधि मंजूर झाला आहे.

यावेळी बोलताना रणजीत पाटील म्हणाले की, स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीसह विविध कामे करण्यासाठी चार कोटी रुपयांचा रुपये निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर लिबर्टी मजदूर मंडळ येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणे व विविध कामे करण्यासाठी 21 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणे या जागेचे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चे कलाम 37 (2) अन्वये मंजूर करून मिळाले. (OPEN SPACE) खुली जागेचे क्षेत्र सार्वजनिक निमसार्वजनिक वापर विभागात समाविष्ट करून गौण फेरफार बदलून मंजूरी मिळाली आहे.

लिबर्टी मजदूर मंडळ येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणे व विविध कामे करणे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चे कलाम 37 (2) अन्वये मंजूर करून मिळाले असून (OPEN SPACE) खुली जागेचे क्षेत्र सार्वजनिक निमसार्वजनिक वापर विभागात समाविष्ट करून गौण फेरफार बदलून मंजूरी मिळाली आहे.

त्यानंतर सदर काम हे सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) कडे वर्ग केलेनंतर PWD ने सदर जागेच्या मातीची टेस्ट घेतलेनंतर व बिल्डिंग ची सपूर्ण डिझाईन केलेनंतर असे लक्षात आले की सदर कामासाठी 20 ते 22 फुट खाली राफ्ट व फौंडेशन घावे लागत आहे व त्यासाठी खर्च खूप वाढत होता. ही बाब महाराष्ट्रचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातल्यानंतर मुख्यमंत्री यांनी लिबर्टी मजदूर मंडळ येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणे व विविध कामे करणे. टप्पा क्रं. 2 साठी 21 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. त्यामुळे आता कराड शहराच्या वैभवात भर पडणारे दोन्हीही प्रोजेक्ट पूर्ण होण्यास कोणतीही अडचण राहिलेली नाही.

कराड नगरपरिषद कार्यालयतील 78 सफाई कामगार यांना वारसाहक्काने वारसास लाड शिफारशिनुसार नेमणुका मिळणेबाबत येणाऱ्या अडचनीबद्दल मुख्यमंत्री यांना सांगितल्यानंतर त्यांनी  तातडीने त्याचा आदेश प्राप्त केलेला आहे. त्यामुळे त्या कामगारांना वारसाहक्काने वारसास लाड शिफारशिनुसार नेमणुकीबाबतचा अडथळा दूर करण्यात आलेला आहे. त्याबत शासनाने स्वयंस्पष्ट आदेश पारित केलेला आहे.

शहरातील या दोन महत्वपूर्ण विकासकामा साठी निधी दिल्याबद्दल आणि बांधकामास येणाऱ्या अडचणीचा गौण फेरफार बदलून मंजूरी दिले बद्दल व कर्मचारी यांची वारसाहक्काने वारसास लाड शिफारशिनुसार नेमणुकीबाबतचा अडथळा दूर केलेबद्दल मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई व रणजीत पाटील नाना यांचे स्मारक समिती तसेच लिबर्टी मजदर मंडळाकडून  आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक