Posts

Showing posts from October, 2024

आ. पृथ्वीराज चव्हाण हाच एकमेव योग्य चेहरा : डॉ. इंद्रजित मोहिते...

Image
आ. पृथ्वीराज चव्हाण हाच एकमेव योग्य चेहरा : डॉ. इंद्रजित मोहिते... वडगाव हवेली येथे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ मोहिते गटाचा कार्यकर्ता मेळावा... कराड, दि.31 : विधानसभेत जाणारा माणूस हा कोणाचाही हस्तक नसावा. तो कोणाचा चापलुस नसावा. तो स्वतंत्र व स्वतः च्या बुध्दीने आपल्या मतदारसंघाचे विचार मांडण्याची क्षमता, वक्तृत्व व अभ्यासू असावा. याकरिता मला पृथ्वीराज बाबांपेक्षा दुसरा कोणताही श्रेष्ठ उमेदवार दिसत नाही. कराड दक्षिणेचा खऱ्या अर्थाने उर्वरित विकास साधण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण हे एकमेव योग्य चेहरा आहेत. असे मत भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी व्यक्त केले. वडगाव हवेली (ता. कराड) येथे राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ डॉ. इंद्रजित मोहिते गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. सर्जेराव थोरात अध्यक्षस्थानी होते. उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण, अॅ ड. उदयसिंह पाटील - उंडाळकर, प्रा. धनाजी काटकर, शिवराज मोरे, राजेंद्र चव्हाण, रोहित पाटील, संभाजी काकडे, शिवराज मोहिते, जे. डी. मोरे, अधि...

कराड शहरातील वाढीव भागात अतुल भोसले यांचा प्रचार

Image
  वाढीव भागातील नागरिक अतुल भोसले यांच्या पाठीशी.... कराड, दि.31 : ज्यांना आम्ही आमदार म्हणून निवडून दिले, ते इकडे कधी फिरकलेच नाहीत अशी टीका आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर करत, कराड शहरातील वाढीव भागातील स्थानिक नागरिकांनी या परिसरातील समस्यांचा पाढा भाजपा – महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासमोर वाचून दाखविला. आमची मते घेऊन, नंतर ढुंकुनही न पाहणाऱ्या आमदाराला या निवडणुकीत धडा शिकविणार असल्याचे सांगून, वाढीव भागात येऊन आमच्या समस्या जाणून घेणाऱ्या आणि त्या सोडविण्यासाठी तत्परता दाखविणाऱ्या डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याच पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. कराड शहरातील वाढीव भागातील दौलतनगर कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, मुजावर कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा पूर्व भाग, धाराशिव वसाहत, शिक्षक कॉलनी, सूर्यवंशी मळा, अष्टविनायक कॉलनी या परिसरात डॉ. अतुलबाबा भोसले यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून, या भागातील समस्या जाणून घेतल्या. यावेळी स्थानिकांनी विद्यमान आमदारांवर टीकेची झोड उठवत, ज्यांना आमदार म्हणून निवडून दिले ते लोकप्रतिनिधी इकडे कधी फिरकलेच ना...

सिंचन प्रकल्पांच्या चौकशीची शिक्षा मला भोगावी लागली; आ. चव्हाण

Image
सिंचन प्रकल्पांच्या चौकशीची शिक्षा मला भोगावी लागली; आ. चव्हाण... कराड दि. 30 - महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना मी सिंचन प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढली होती. ती कोणताही घोटाळा उघड करण्यासाठी नव्हे, तर त्याबाबतची माहिती मागवण्यासाठी काढली. मुळात याप्रकरणी घोटाळा हा शब्द मी कधी उच्चारलाच नाही. परंतु, भोपाळ येथे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुक प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचे जाहीरपणे सांगून त्यावर शिक्कामोर्तब केले होते. यापेक्षा आणखी मोठा पुरावा काय द्यायचा, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.  दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर कराड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी लोकनेते विलासकाका पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील-उंडाळकर, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांची उपस्थिती होती.  सिंचन घोटाळ्याबाबत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारले असता त्यांनी वरील उद्गार काढले. श्री. चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात...

कराडात तडीपार गुंडाकडून देशी बनावटीच्या दोन पिस्तूल जप्त

Image
कराड शहरात तडीपार गुंडाकडून दोन देशी बनावटीच्या पिस्तूल जप्त  2 मॅक्झीन, 2 जिवंत काडतुसे, 1 मोटार सायकल असा 2,20,640/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त... कराड दि. 29 (प्रतिनिधी) सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेने कराड शहरात रेकॉर्डवरील तडीपार गुंडाकडून दोन देशी बनावटीची पिस्तूल, दोन मॅक्झिन व दोन जिवंत काढतोस याच्यासह एक मोटरसायकल असा दोन लाख वीस हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळालेल्या माहितीनुसार शहरातील भेदा चौक परिसरामध्ये कराड शहर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार निशिकांत शिंदे हा बेकायदेशीररित्या अवैध शस्त्र विक्री करणे करीता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी सहा. पोलीस निरीक्षक रोहित फाणे यांचे  अधिपत्याखाली एक पथक तयार करुन त्यांना मिळाले बातमीचा आशय सांगुन सदर ठिकाणी जावुन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक रोहित फाणे यांचे पथकाने कराड शहरामध्ये जावुन भेदा चौकात सापळा लावला असता सदर ठिकाणी मिळाले बातमीतील इसम हा त्याचेकडील मोटार सायकल वरुन...

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून 31 तर दक्षिण मधून 28 अर्ज दाखल

Image
  कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून पै. संतोष वेताळ यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून 31 तर दक्षिण मधून 28 अर्ज दाखल कराड उत्तर मध्ये 28 उमेदवार तर दक्षिण मध्ये 22 उमेदवार कराड, दि. 29 (प्रतिनिधी) कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत तर आज अखेर या मतदारसंघातून 28 उमेदवारांनी 31 अर्ज दाखल केले आहेत. कराड दक्षिण मतदारसंघातून 9 उमेदवारांनी 12 दाखल केले आहेत तर आज अखेर या मतदारसंघातून 22 उमेदवारांनी 28 अर्ज दाखल केले आहेत. कराड उत्तर मधून 19 जणांनी अपक्ष तर कराड दक्षिण मधून 15 जणांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत उद्या दिनांक 30 ऑक्टोंबर रोजी दाखल झालेल्या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे व विक्रांत चव्हाण यांनी दिली. बाळासाहेब उर्फ शामराव पांडुरंग पाटील,पक्ष राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) रा.कराड यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून एकूण 2 अर्ज तर मनोज भिमराव घोरपडे, पक्ष (भाजप) रा.मत्यापूर, पोस्ट माझगाव, यांनी भा.ज....

तीन कोटी लूट प्रकरणातील मुख्य संशयित पोलीस स्टेशनला हजर.

Image
  तीन कोटी लूट प्रकरणातील मुख्य संशयित पोलीस स्टेशनला हजर. कराड दि. 28 (प्रतिनिधी) पुणे बेंगलोर महामार्गावर कराड नजिक तीन कोटी लूट प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आसिफ सलिम शेख हा कराड शहर पोलीस स्टेशनला स्वतःहून हजर हाजर झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच दहा जणांना अटक केली आहे. दहा आरोपी कडून दोन कोटी 89 लाख 34 हजार रुपये हस्तगत केल्यानंतर पुन्हा केलेल्या तपासात आणखी साडेचार लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईहून हुबळीकडे तीन कोटी रुपये घेऊन निघालेली कार कराड नजीकच्या मलकापूर येथे अडवून लूट केली होती. याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी तपास करून 10 संशयतांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 95 टक्के रक्कम हस्तगत केली होती. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी आसिफ सलिम शेख रा. शिंदे गल्ली कराड हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. 15 आक्टोंबर रोजी पहाटे ही पुणे बेंगलोर महामार्गावर कराड नाजिक मलकापूर येथे ही घटना घडली होती.  दरम्यान या प्रकरणातील फरार आसिफ सलिम शेख रा. शिंदे गल्ली कराड हा स्वतःहून कराड शहर पोलीस स्टेशनला आज सायंकाळी उशिरा हजर झाला ...

आ. पृथ्वीराज चव्हाण उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

Image
आ. पृथ्वीराज चव्हाण बाबा सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार कराड, दि. 27 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवार, दि. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कराड येथील निवडणुक अधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दिपावली सणाच्या अनुषंगाने व्यापारी व खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोय होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांच्या मागणीचा विचार करून शक्तीप्रदर्शन न करता मागच्या वेळी सारखेच यावेळी सुद्धा अत्यंत साध्या पद्धतीने आ. पृथ्वीराज चव्हाण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तरी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले आहे.

कराड दक्षिणेत काॅंग्रेसचा हात सक्षम असून कमळाचा आपल्या भागात उपयोगच नाही - बिरू कचरे

Image
कराड दक्षिणेत काॅंग्रेसचा हात सक्षम असून कमळाचा आपल्या भागात उपयोगच नाही - बिरू कचरे कासारशिरंबे येथे आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा संवाद कराड दि.26 - स्व. विलासराव पाटील- उंडाळकर काका यांनी रयत संघटना स्थापन केली. वाडी- वस्तीवर काकांचा निष्ठावंत कार्यकर्ता आजही उदयदादांच्या सोबतीने पृथ्वीराज बाबांना आमदार करणारच आहे. कराड दक्षिणेत काॅंग्रेसचा हात सक्षम असून कमळ विझवायचं काम करेल, असा विश्वास रयत संघटनेचे बिरू कचरे यांनी व्यक्त केला.  कासारशिरंबे (ता. कराड) येथील कार्यकर्त्यांशी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी संवाद साधला. यावेळी पांडुरंग बोद्रे, कराड तालुका काॅंग्रेस उपाध्यक्ष जयवंत पाटील, प्रा. धनाजी काटकर, अजित पाटील- चिखलीकर, रयत कारखान्याचे संचालक जयवंत बोंद्रे, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक शंकर यादव, धनाजी थोरात, देवदास माने यांच्यासह रयत संघटनेचे तसेच काॅंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी प्राणाची आहुती दिली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस च्या व्यासपीठावर सर्व नेते ए...

अविनाश मोहितेंची ताकद आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी...

Image
अविनाश मोहितेंची ताकद आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी...  रेठरे बुद्रुक येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्धार... कराड दि.26-: रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलने आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला. अविनाश मोहिते यांची कराड दक्षिणमध्ये मोठी ताकद आहे. त्यामुळे त्यांच्या गटाने आ. पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा दिल्यामुळे आ. पृथ्वीराज यांचा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विजय सुकर झाला आहे. अविनाश मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते खा. शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी हा घटक पक्ष बरोबरीने काम करत आहे. या पक्षात अविनाश मोहिते यांच्याकडे प्रदेश स्तरावरील जबाबदारी आहे. गेल्या महिन्यात खा. शरद पवार हे रेठरे बुद्रुक येथे अविनाश मोहिते यांना भेटण्यासाठी आले होते. या भेटीमध्ये श्री. मोहिते यांनी कृष्णा कारखान्याचे संस्थापक आबासाहेब मोहिते यांचे आणि शरद पवार यांचे ऋणानुबंध असणारे जुने छायाचित्र खा. पवार यांना भेट ...

कराड दक्षिणची जनता काँग्रेसच्या पाठीशी; आ. पृथ्वीराज चव्हाण...

Image
बेलवडे : आ. पृथ्वीराज चव्हाण ग्रामस्थांशी संवाद साधताना... कराड दक्षिणची जनता काँग्रेसच्या पाठीशी; आ. पृथ्वीराज चव्हाण बेलवडे येथे कार्यकर्त्यांशी संवाद; अनेकांचा पक्ष प्रवेश  कराड दि.25 माझ्या राजकीय कारकिर्दीत कोट्यावधीची विकासकामे करता आली. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात 1800 कोटीची विकासकामे केली. विकासकामे सुचविण्याचा अधिकार राज्यघटनेने लोकप्रतिनिधीना दिला आहे. विकास कामाच्या जीवावरच मला लोकांनी दोन वेळा लोकसभेत आणि दोन वेळा विधानसभेत पाठवले. पुन्हा काँग्रेसच्या पाठीशीच कराड दक्षिणची जनता उभी राहील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील बेलवडे (ता. कराड) येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी शिवाजीराव थोरात, पै. नानासो पाटील, नितीन थोरात, जखिणवाडीचे माजी सरपंच नरेंद्र पाटील, भगवान मोहिते, शहाजी मोहिते, माणिकराव मोहिते, भास्करराव मोहिते, धनाजी थोरात, युवक काॅंग्रेसचे देवदास माने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  शिवाजीराव मो...

पृथ्वीराज बाबांना 50 हजारांचे मताधिक्य देण्याचा कार्यकर्त्याचा निर्धार

Image
पृथ्वीराज बाबांना 50 हजारांचे मताधिक्य देण्याचा कार्यकर्त्याचा निर्धार पुढील 30 दिवस पृथ्वीराज चव्हाणांच्या विजयासाठी : कार्यकर्त्याचा निर्धार... कराड दि. 20 - काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात कराड दक्षिण मतदार संघातून पृथ्वीराज चव्हाण यांना 50 हजाराच्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच पुढील 30 दिवस पृथ्वीराज चव्हाण यांच्या विजयासाठी असा निर्धार केला.  कराड येथे विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव, फारूख पटवेकर, कराड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, अजितराव पाटील- चिखलीकर, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, मलकापूर नगरपरिषेदेच्या माजी नगराध्यक्षा निलम येडगे, जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्षा गितांजली थोरात, कोयना दूध संघाचे उपाध्यक्ष शिवाजी जाधव, बंडा नाना जगताप, नानासो पाटील, नरेंद्र पाटील, नितीन थोरात, डॉ सुधीर जगताप, निवासराव थोरात, पै. तानाजी चौरे, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, कराड दक्षिण युवक काँग्रेस अध्यक्ष ...

तीन कोटी लुटीचा गुन्हा उघड; १० आरोपींना मुद्देमलासह अटक

Image
  कराड शहर पोलीस ठाणे पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची दमदार कामगिरी 24 तासामध्ये दरोड्याचा गंभीर गुन्हा उघड करुन गुन्हयातील रोख रक्कम 2,89,34,000/- रुपये हस्तगत व 10 आरोपी यांना केली अटक कराड दि.19 मुंबईहून हुबळी कडे तीन कोटी रुपयांची रक्कम घेऊन निघालेल्या कारला मलकापूर हद्दीत गाडी आडवी मारून अज्ञात इसमानी रक्कम लुटले ची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेत कराड शहर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेने गतीने तपास करून 24 तासात हा गुन्हा उघडकीस आणला असून दोन कोटी 89 लाख 34 हजार रुपये हस्तगत करत दहा आरोपींना अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. 15 ऑक्टोंबर रोजी सुमारास यातील फिर्यादी मुंबई पार्टीचे 3 कोटी रुपये रोख रक्कम क्रेटा गाडी MH12 ML6005 मधुन घेवुन मुंबई ते हुबळी अशी घेवुन जात असताना कराड मलकापूर नजीक गाडी आडवी मारुन कार मधून दोन अनोळखी मुले खाली उतरली तसेच दुचाकी मोटार सायकलवरून आणखी दोन अनोळखी इसम असे उतरले. त्यापैकी एकाने हॉकीस्टिकने क्लिनर साईटची काच फोडली. तसेच स्विप्ट गाडीतील दोन इसमांनी गाडीचा दरवाजा उघडुन ...

कराडत तीन कोटीच्या लूटप्रकरणी शहरातील दहा आरोपीना अटक

Image
कराडात तीन कोटीच्या लूटप्रकरणी शहरातील दहा जण अटकेत... दहा जणांना सहा दिवस पोलीस कोठडी;निम्मा मुद्देमाल हस्तगत कराड, दि. 17 (प्रतिनिधी) मुंबईहून हुबळी येथे तीन कोटी रुपयांची रक्कम घेऊन जाणाऱ्या कारला अडवून तीन कोटीची लूट केल्याप्रकरणी पोलिसांनी शहरातील आठ ते नऊ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून लुटलेली रक्कम हस्तगत केली आहे. लुटलेली रक्कम कराड शहरातील काही बहाद्दरांकडे देण्यात आली होती. मात्र हे बहाद्दर पोलिसांच्या रडारवर आल्याने पोलिसांनी त्यांना तात्काळ बेड्या घालत त्यांच्याकडील रक्कम हस्तगत केली आहे. उद्या या घटनेचा पूर्णपणे खुलासा होणार आहे. या प्रकरणात फिर्यादीचा आरोपी झाल्याचे स्पष्ट होत आले आहे. तीन कोटी रुपयांची लूट केल्यानंतर संबंधितांनी सदर रक्कम आपआपसात वाटून घेतली. कोणाला पाच लाख दिले. कोणाला दहा लाख दिले. कोणाला पन्नास लाख दिले. कोणाला पंचवीस लाख दिले. आणि हीच रक्कम घेणारे कराड शहरातील काही बहाद्दर पोलिसांच्या रडारवर आले. यातील काही नग रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत तर काही जणांनी नुकताच अशा या क्षेत्रात प्रवेश केलेला आहे. पोलिसांनी ज्यावेळेस या नगांची धरपकड केली त्यावेळी संप...

तीन कोटीच्या लूटप्रकरणी कराड तालुक्यातील दोन संशयित ताब्यात....

Image
  तीन कोटीच्या लूटप्रकरणी कराड तालुक्यातील दोन संशयित ताब्यात... कराड, दि. 16 (प्रतिनिधी) मुंबईहून हुबळी येथे तीन कोटी रुपयांची रक्कम घेऊन निघालेली कार कराड नजिक अज्ञात पाच जणांनी अडवून लुटल्याची फिर्याद कराड शहर पोलिसात दाखल झाली आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री शहरा नजीकच्या मलकापूर येथे घडली असून पोलिसांनी या प्रकरणी कराड तालुक्यातील दोघा संशयतांना ताब्यात घेतले असून तीन जण फरार झाले आहेत. याच्या पुढील तपासासाठी पाच पथके रवाना झाली आहेत.  दरम्यान या लूट प्रकरणाचे कनेक्शन कराड तालुका व शहराशी संबंधित असून पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास करत पाच पैकी दोन संशयतांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे, तर अन्य तीन फरार आरोपींच्या शोधार्थ विविध ठिकाणी पथके रवाना झाली आहेत. उद्यापर्यंत या लूट प्रकरणाचा संपूर्ण खुलासा होणार असल्याचे समजते. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विंग ता. कराड येथील अवधूत कणसे यांचा रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने वेगवेगळ्या पार्टीकडून घेऊन ते संबंधित पार्टीला पोहोचण्याची काम करतात. त्यांच्या क्रेटा गाडी एम एच 12 एम एल 6005 य...

श्री दैत्यनिवारणी मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नातून ५ कोटींचा निधी मंजूर...

Image
श्री दैत्यनिवारणी मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नातून ५ कोटींचा निधी मंजूर कराड, दि.16 : कराड नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री दैत्यनिवारणी मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांतून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा शासन आदेश १४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाला असून, मंदिराच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण समजला जात आहे. कमलालक्ष्मीचे निवास्थान म्हणून पुराणात कराडचा उल्लेख आहे. कराड शहराच्या पश्चिमेस कोयना नदीकाठी श्री दैत्यनिवारणी देवीचे मंदिर आहे. दैत्यांचा नाश करणाऱ्या श्री दैत्यनिवारणी देवीची अष्टभूजा मूर्ती असून, याठिकाणी दरवर्षी नवरात्रीत मोठा उत्सव साजरा केला जातो. नदीकाठी असलेल्या या मंदिराच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंत उभारण्याची मागणी अनेक दिवसांपासून भाविक व कराडवासीयांमधून होत होती.  याबाबत भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करत, भाविकांची ही मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली होती. य...

रूग्वेदिका यादव व जिजाई महिला मंचच्या महिला महामहोत्सवास महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद...

Image
आस्मा इनामदार ठरल्या मिसेस कराडच्या मानकरी ; अलोट गर्दीने भारावली अपूर्वा अन् 'डीपी' रूग्वेदिका यादव व जिजाई महिला मंचच्या महिला महामहोत्सवास महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद कराड दि.16 यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. रूग्वेदिका राजेंद्रसिंह यादव आणि जिजाई महिला मंच व उद्योग समूह यांच्यावतीने घेण्यात आलेल्या महिला महामहोत्सवाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमासाठी हजारो महिलांनी उपस्थिती लावली. यावेळी घेण्यात आलेल्या मिसेस कराड स्पर्धेत आस्मा कागदी-इनामदार यांनी प्रथम क्रमांक मिळवून सोन्याचा हार पटकावला. महोत्सवातील अलोट गर्दीने अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर व बिग बॉस फेम धनंजय पोवार (डीपी) भारावून गेले. कार्यक्रमास राजेंद्रसिंह यादव, माजी नगराध्यक्षा सौ. संगिता देसाई, विजयसिंह यादव, स्मिता हुलवान, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, हणमंतराव पवार, अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर, बिग बॉस उपविजेता धनंजय पोवार, रिल स्टार रवी दाजी, अभिनेते वासू पाटील, माजी नगरसेवक गजेंद्र कांबळे, निशांत ढेकळे, विनोद भोसले, किरण पाटील, प्रीतम यादव, बाळासाहेब यादव, ओंक...

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड दक्षिणेत १ कोटी ९० लाख ५० हजाराचा निधी उपलब्ध...

Image
आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड दक्षिणेत १ कोटी ९० लाख ५० हजाराचा निधी उपलब्ध... कराड, दि. 15 - राज्यातील सरकार विरोधी पक्षांचे असतानाही राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा सिलसिला कायम राखला आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षात सुरुवातीस कोरोनाचे संकट व नंतर राज्यात सत्ताबदल होवूनही कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात कोटयावधी रुपयांचा विकासनिधी आणत आपल्या प्रत्यक्ष कृतीची प्रचिती इतरांना दिली आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी १ कोटी ९० लाख ५० हजार रुपयांचा निधी आणला आहे. या निधीची प्रशासकीय प्रतही मिळाली आहे. मागील कालावधीत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे राज्यस्तरीय अनुसूचित जाती व नवबौध्द घटक योजना २०२४ - २५ अंतर्गत विविध विकासकामांना निधी देण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबतचा अहवाल शासन दरबारी दिला. यास प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यामधून मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी १ कोटी ९० लाख ५० हजाराचा निधी उप...

चौफेर विकासासाठी डॉ. अतुल भोसलेंसारखे कार्यक्षम नेतृत्व गरजेचे : डॉ. सुरेश भोसले...

Image
कार्वे : महायुती सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकासकामाचे उद्‌घाटन करताना कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले. बाजूस अन्य मान्यवर. चौफेर विकासासाठी डॉ. अतुल भोसलेंसारखे कार्यक्षम नेतृत्व गरजेचे : डॉ. सुरेश भोसले... कार्वे येथे ७.४० कोटींच्या विविध विकासकामांचे उद्‌घाटन व भूमिपूजन उत्साहात... कराड, दि.15 : आमदार असताना कुणीही निधी आणेल; पण आमदार नसतानाही भरघोस निधी आणण्याचे कर्तृत्व डॉ. अतुल भोसले यांनी दाखविले आहे. कराड दक्षिणच्या चौफेर विकासासाठी जनतेने डॉ. अतुल भोसलेंसारख्या कार्यक्षम नेतृत्वाची निवड करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कार्वे (ता. कराड) येथे डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ७.४० कोटींच्या विकासकामांच्या भूमीपूजन व उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. महायुती सरकारच्या माध्यमातून आणि भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून कार्वे गावात श्री धानाई मंदिर - गोपाळनगर – शिंदे वस्ती - मोळाचा मळा ते वडगाव हवेली या रस्त्यासाठी ४ कोटी २० लाख रुपयांचा...

कराड शहरातील दोन महत्त्वपूर्ण कामासाठी 25 कोटींचा निधी मंजूर...

Image
छ. संभाजी महाराज स्मारक व लिबर्टी साठी 25 कोटींचा निधी मंजूर... कराड, दि. 15  (प्रतिनिधी)  शहरातील स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यासह लिबर्टी मजदूर मंडळाच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती स्मारक समितीचे संस्थापक सचिव रणजीत नाना पाटील व लिबर्टीच्या रमेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्मारक समिती व लिबर्टी मंडळाचे सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे विशेष सहकार्यातून व रणजीत पाटील नाना यांचे विशेष प्रयत्नातून कराड शरातील या दोन महत्वपूर्ण कामांसाठी 25 कोटी रुपये निधि मंजूर झाला आहे. यावेळी बोलताना रणजीत पाटील म्हणाले की, स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीसह विविध कामे करण्यासाठी चार कोटी रुपयांचा रुपये निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर लिबर्टी मजदूर मंडळ येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणे व विविध कामे करण्यासाठी 21 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणे या जागेचे महाराष्ट्र...

राजेंद्रसिंह यादव यांना ताकद देणार;खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ग्वाही....

Image
  राजेंद्रसिंह यादव यांना ताकद देणार;खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची ग्वाही.... कराडमध्ये २०९ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन... कराड दि.14 - राजेंद्रसिंह यादव व शरद कणसे यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराड शहरासाठी सुमारे २०९ कोटी रुपयांचा निधी दिला. एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून रेकॉर्ड ब्रेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. त्यांचे हात बळकट करा. शिवसेनेच्या बळकटीसाठी कराडमध्ये राजेंद्रसिंह यादव यांना पक्षाच्या वतीने संपूर्ण ताकद देण्यात येईल, अशी ग्वाही शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. राजेंद्रसिंह यादव यांच्या अथक पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराच्या भुयारी गटर योजना, पाणी पुरवठा योजनेसह विविध विकासकामांसाठी सुमारे २०९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामांचे ऑनलाइन भूमिपूजन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, चंद्रकांत जाधव, शहर प्रमुख राजेंद्र माने, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, हणमंत पवार, माजी नगराध्...

बांधकाम कामगारांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये मिळणार मोफत उपचार

Image
  कराड : कृष्णा हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार वैद्यकीय नोंदणी कक्षाचा प्रारंभ करताना डॉ. विजय कणसे व एस. ए. माशाळकर यांच्यासह अन्य मान्यवर. बांधकाम कामगारांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये मिळणार मोफत उपचार वैद्यकीय नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष सुरु; कुटुंबियांनाही मिळणार लाभ कराड, दि. 14 : महाराष्ट्र शासन आणि इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोंदीत बांधकाम कामगारांना वैद्यकीय योजनांचा लाभ दिला जातो. याअंतर्गत येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना २ लाखांपर्यंतचे उपचार मोफत देण्यात येणार आहेत. या कामगारांच्या वैद्यकीय नोंदणीसाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कक्षाची सुरुवात आजपासून करण्यात आली. महाराष्ट्र शासन आणि इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोंदीत बांधकाम कामगारांसाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ सर्व बांधकाम कामगारांना मिळवून देण्यासाठी डॉ. अतुल भोसले विशेष प्रयत्नशील आहे. नोंदीत बांधकाम कामगारांना २ लाखापर्यंतच्या उपचार सुविधांबरोबर अन्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. या सुविधा आता कृष्णा हॉस...

कालवडे, कासारशिरंबेत ४.८५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण...

Image
कासारशिरंबे : महायुती सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकासकामाच्या भूमीपूजनप्रसंगी भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. अतुल भोसले. कालवडे, कासारशिरंबेत ४.८५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण... डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून विकासनिधी उपलब्ध... कराड दि.13 : महायुती सरकारच्या माध्यमातून आणि भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नांतून कराड दक्षिणमधील कालवडे व कासारशिरंबे गावांमधील विविध विकासकामांसाठी सुमारे ४ कोटी ८५ लाख रुपयांचा विकासनिधी उपलब्ध झाला आहे. या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. डॉ. भोसले यांच्या हस्ते कालवडे व कासारशिरंबे येथे मातोश्री शेत पाणंद रस्ते योजनेतून १० पाणंद रस्ते, तसेच राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पामधून रा.मा. ४ कालवडे - बेलवडे – कासारशिरंबे - साळशिरंबे रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग सुधारणा करणे या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच मनेरगा अंतर्गत कालवडे येथे ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले असून, त्याचे लोकार्पणही करण्यात आले...

कराडमध्ये सोमवारी भव्य महिला महामहोत्सवाचे आयोजन...

Image
कराडमध्ये सोमवारी भव्य महिला महामहोत्सवाचे आयोजन... राजेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन... कराड दि.13 - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कराडमध्ये सोमवारी 14 रोजी भव्य महिला महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंत विकास आघाडी आणि जिजाई महिला मंच आणि उद्योग समूह यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन उद्या दुपारी 12 ते सायंकाळी सहा या वेळेत करण्यात आले आहे. सौ. रुग्वेदिका राजेंद्रसिंह यादव यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पाक कला स्पर्धा, मिस कराड, होम मिनिस्टर, लाईव्ह ऑर्केस्ट्रा दांडिया, नारी सन्मान सोहळा, महिला बचत गटाच्या वस्तू प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नारी शक्ती सन्मान अंतरंग अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रम फक्त महिलांसाठी असून त्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. येणाऱ्या प्रत्येक महिलेला हमखास भेटवस्तू देण्यात येणार आहे. अल्पोपहाराची सोय करण्या...

कराडच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. अतुल भोसलेंना साथ द्या : ना. देवेंद्र फडणवीस...

Image
कराड-छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम च्या नूतनीकरणाचा शुभारंभ करताना डॉ. अतुल भोसले व मान्यवर कराडच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. अतुल भोसलेंना साथ द्या : ना. देवेंद्र फडणवीस... छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम व वाखाण रोड विकासकामाचे ई-भूमीपूजन उत्साहात. ... कराड, दि. 11 : कराड शहराच्या आणि एकूणच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी डॉ. अतुल भोसले घेत असलेले प्रयत्न विशेष लक्षवेधी आहेत. कराड दक्षिणमधील अनेक विकासकामांसाठी ते सातत्याने माझ्याकडे पाठपुरावा करतात. कराड दक्षिणमध्ये भरघोस विकासनिधी खेचून आणण्यासाठी डॉ. अतुलबाबा दाखवित असलेली तळमळ आणि करत असलेले प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत. येत्या काळात कराड दक्षिणचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी डॉ. अतुल भोसले यांना साथ द्या, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले.  महायुती सरकारच्या माध्यमातून आणि डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या एकूण १४६.५० कोटींच्या निधीतून साकारण्यात येणाऱ्या कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे नुतनीकरण व वाखाण रोड ते कोरेगाव – कार्वे रस्त्याच्या विकासकामाच्या...

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने घेतलेल्या आरोग्य शिबिरात 3500 रुग्णांनी घेतला लाभ....

Image
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने कराड व मलकापूर येथे राबविण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात 3500 रुग्णांनी लाभ घेतला.... कराड दि.11 : माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने शहरी भागासाठी राबविण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात कराड व मलकापूर शहरातील जवळपास 3500 नागरिकांनी लाभ घेतला. या आरोग्य शिबिराचे उदघाटन माज़ी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, सातारा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राहुल चव्हाण, इंद्रजित चव्हाण, कराड दक्षिण युवक काँग्रेस अध्यक्ष दिग्विजय पाटील, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, प्रशांत देशमुख,आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, राज्यातील जनतेला आरोग्य सेवा हि मोफत दिली गेली पाहिजे. यासाठी सरकारने धोरण राबविले पाहिजेत व यानुसार अर्थसंकल्पात तरतूद केली गेली पाहिजे. माझ्या मुख्यमंत्री कार्यकाळात राजीव गांधी जीवनदायी योजना हि दीड लाख रुपयापर्यंतची मोफत आरोग्य योजना सुरु ...

सर्वसामान्यांसाठी सरकारी आरोग्य यंत्रणा सक्षम असणे गरजेचे : आ. पृथ्वीराज चव्हाण...

Image
कार्वे : येथील विविध विकासकामांच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलताना आ. पृथ्वीराज चव्हाण, व्यासपीठावर अॅ ड. उदयसिंह पाटील व इतर सर्वसामान्यांसाठी सरकारी आरोग्य यंत्रणा सक्षम असणे गरजेचे : आ. पृथ्वीराज चव्हाण... कार्वेमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ ; राज्यात सत्ताबदल होणार असल्याची दिली ग्वाही... कराड दि.11 : देशात आणि राज्यात कोरोनातील उपचार कुठेही मोफत झालेले नाहीत. याबाबत खाजगी दवाखाने चुकीचा प्रचार करत आहेत. मी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलून भाजप सरकारने योजना सुरू ठेवली. कोरोनामध्ये याच योजनेतून सगळीकडे मदत देण्यात आली. परंतु कुठेही मोफत उपचार झाले नाहीत. याबाबतचा खोटा कांगावा सुरू आहे. मोठ्या दवाखान्यांना आयकरात सुट मिळवताना काही मोफत उपक्रम राबवावे लागतात. यातूनच काही आमिषे दाखवून सर्वसामान्य जनतेची लूट ते करतात. याकरिता सरकारी आरोग्य यंत्रणा सक्षम करणे गरजेचे समजून माझे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून कार्वेसाठी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण झाले आहे. पुढील काळात रेठरे बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवून ग्रामी...