स्व. जयमाला भोसले स्मृती उद्यानाचे कोयना वसाहतीत भूमिपूजन...

कोयना वसाहत : स्व. जयमाला जयवंतराव भोसले स्मृती उद्यानाच्या भूमिपूजन करताना डॉ. सुरेश भोसले व इतर... 

कोयना वसाहतीत स्व. जयमाला भोसले स्मृती उद्यानाचे भूमिपूजन...

कराड, दि.8: कोयना वसाहत (ता. कराड) येथे स्व. जयमाला जयवंतराव भोसले स्मृती उद्यान साकारण्यात येत आहे. या स्मृती उद्यानाचे भूमिपूजन कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोयना वसाहतीमधील शिवराज सोसायटी परिसरात स्व. जयमाला जयवंतराव भोसले यांच्या नावाने स्मृती उद्यान उभारण्यात येणार आहे. या स्मृती उद्यानात लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी उभारण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आरामशीर बैठक व्यवस्था करण्यात येणार असून, त्यांच्यासाठी वॉकिंग ट्रॅकही साकारण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, स्व. जयमाला जयवंतराव भोसले स्मृती उद्यान लहान मुलांपासून, तरुण पिढी ते ज्येष्ठ लोकांना उपयुक्त ठरणार आहे. या उद्यानामुळे कोयना वसाहतीच्या सौंदर्यात निश्चितच भर पडणार आहे.

डॉ. अतुल भोसले म्हणाले, कराड परिसरातील सर्वात प्रतिष्ठित जागांपैकी कोयना वसाहत हा परिसर आहे. डॉ. सुरेशबाबांच्या संकल्पनेतून हे उद्यान उभारले जाणार आहे. याचे लवकरच काम चालू करणार आहोत. त्यासोबतच कोयना वसाहतीतले सर्व रस्ते हे लवकरात लवकर चांगल्या दर्जाचे करण्यात येणार आहेत.  कोयना वसाहतीला जास्तीत जास्त निधी देऊन सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यास मी कटीबद्ध आहे.

प्रारंभी कोयना वसाहत येथे महाराष्ट्र शासनाच्या मनरेगा अंतर्गत अतिरीक्त राज्य कुशल निधीतून, १० लाख विकास निधीच्या सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता कामाचे भूमिपूजन डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमास य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, शिवराज सोसायटीचे चेअरमन शंकरराव थोरात, व्हा. चेअरमन डॉ. बाळासाहेब वाठारकर, संचालक बालिश थोरात, सुधाकर गुरव, शरद पाटील, डॉ राजेंद्र पाटील, चंद्रकांत खिलारे, सुहास पवार, उत्तम जाधव, प्रियांका कुलकर्णी, सुजाता पवार, सचिव नितीन सांडगे, कोयना वसाहतीच्या सरपंच सुवर्णा वळीव, उपसरपंच उमेश कुलकर्णी, ग्रा. प. सदस्य विनायक कुलकर्णी, चंद्रशेखर पाटील, सम्राट पाटील, निलेश भोपते, रजनी गुरव, सुनीता भोसले, संगीता पाटील, कुसुम पुजारी, शीतल जाधव, महेश कुलकर्णी, नंदू कुलकर्णी, प्रदीप जाधव, डॉ. अविनाश पाटील, अशोक जकाते , कृष्णा भुसारी, विजय दुर्गावळे, सुरेश शिंदे, अशोक गुरव, किशोर जकाते, बिपीन मिश्रा, उमेश गुरव व ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुकले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक