कृष्णा कारखाना गळीतासाठी लवकर सज्ज राहणार : डॉ. सुरेश भोसले...
कृष्णा कारखाना गळीतासाठी लवकर सज्ज राहणार : डॉ. सुरेश भोसले...
कृष्णा कारखान्याचा ६५ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात ; कर्मचाऱ्यांना दोन पगार बोनस जाहीर...
शिवनगर, ता. ६ : येणाऱ्या गळीत हंगामात साखर कारखाने सर्वसाधारणपणे १२० दिवस चालतील. यंदाचा गळीत हंगाम हा साखर कारखानदारीसाठी लहान हंगाम असणार आहे. कृष्णा कारखान्याचे ऊस गाळप लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने कारखाना गळीतासाठी लवकर सज्ज राहणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ६५ व्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा ६५ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. याप्रसंगी कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, दत्तात्रय देसाई, जे डी मोरे, विलास भंडारे, जयश्री पाटील, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, दीपक पाटील, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, कार्यकारी संचालक महावीर घोडके, मनोज पाटील, वैभव जाखले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
चेअरमन डॉ. सुरेश भोसले पुढे म्हणाले, कारखान्यात कमी कालावधीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आता आधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. यंदा कारखाने कमी दिवस चालणार आहेत. या बदलासाठी तयार राहण्यासाठी आपण कारखान्यात सर्वप्रथम आधुनिकीकरण केले. याचा निश्चितच फायदा आपल्याला होईल.
कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ.अतुलबाबा भोसले म्हणाले, गेल्या ९ वर्षात आपण कारखान्यात महत्वपूर्ण बदल केले. कारखान्याची दैनंदिन क्षमता प्रतिदिन ७२०० मेट्रिक टन पासून १२००० मेट्रिक टनांपर्यंत नेली आहे. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चांगले धोरण राबविण्यात येणार असून यामध्ये विम्यासारखी योजना लागू करण्यात आली पाहिजे. कारखान्याच्या माध्यमातून 120 कोटी रुपयांचा बायो सीएनजी प्रकल्प उभारण्याचा मानस आहे, ज्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होणार आहे. यावर्षी कारखान्याच्या इतिहासातील उच्चांकी गाळप निश्चित करू, असा विश्वास डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केला.
कर्मचाऱ्यांना दोन पगार बोनस...
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना गेल्या वर्षीप्रमाणे दिवाळी सणानिमित्त कामगारांना दोन पगार बोनस देणार असल्याची घोषणा चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केली. तसेच कामगारांना विमा उतरवण्या संदर्भात लवकरच उपाययोजना करण्यात येतील असे कर्मचाऱ्यांना आश्वस्त केले.
दरम्यान बेलवडे बुद्रुक येथील शेतकरी प्रदीपकुमार मोहिते व रेठरे हरणाक्ष येथील शेतकरी संकेत मोरे यांना सर्वाधिक ऊस उत्पादनासाठी द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते या सभासद शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
उपाध्यक्ष जगदीश जगताप यांनी स्वागत व प्रास्तविक केले. संचालक लिंबाजी पाटील यांनी आभार मानले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. प्रारंभी मच्छिंद्रगडावरून आणलेल्या ज्योतीचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी संचालक ब्रम्हानंद पाटील, शिवाजीराव थोरात,रेठरे बुद्रुकचे सरपंच हणमंत सूर्यवंशी, कोरेगावचे सरपंच बाळासाहेब पाटील, पै. आनंदराव मोहिते, एम के कापूरकर, बाळासाहेब पाटील, जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी व सभासद शेतकरी उपस्थित होते.

Comments
Post a Comment