'प्रधानमंत्री ग्रामसडक'अंतर्गत कराड दक्षिणमधील ९.९० कोटींची विकासकामे प्रगतीपथावर...

 

'प्रधानमंत्री ग्रामसडक'अंतर्गत कराड दक्षिणमधील ९.९० कोटींची विकासकामे प्रगतीपथावर...

खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांतून निधी मंजूर....

कराड, ता. २८ : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यात १३४ कोटी ३८ लाख रुपयांची विकासकामे होणार असून, यापैकी कराड दक्षिणमध्ये ९ कोटी ९० लाख रुपयांची विकासकामे प्रगतीपथावर आहेत. भारतीय जनता पक्षाचे सातारा लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून आणि भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांतून हा निधी मंजूर झाला आहे. 

कराड दक्षिणमधील विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करावा, याबाबत डॉ. अतुल भोसले सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यानुसार त्यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कराड दक्षिणमधील रस्ते विकासाच्या कामांसाठी निधी मिळावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार ९ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. 

या निधीतून साकारण्यात येत असलेले एम.आर.एल. १० एन. एच. ४ ते गोटे विजयनगर ते बिरोबा मंदिर ते विमानतळ रोड (२ कोटी ५३ लाख) आणि एम.आर.एल. ११ कोडोली ते वडगाव हवेली ते गणेश नगर रोड (४ कोटी ४१ लाख) ही दोन कामे प्रगतीपथावर आहेत. तर एम.आर.एल. २३ एन. एच. १६ ते गोवारे सयापुर टेम्भू एस. एच. १४२ ए रोड (२ कोटी ९४ लाख) हे काम निविदा प्रक्रिया स्तरावर आहे. या कामांमुळे या भागातील दळणवळणाला अधिक चालना मिळण्यास मदत होणार आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक