कोयना बँकेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न....

कोयना बँकेच्या २८ व्या वार्षिक सभेस मार्गदर्शन करताना बँकेचे चेअरमन, संचालक मंडळ व मान्यवर...

कोयना बँकेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न...

कराड दि.3-अधुनिक बैंकिंग तंत्रज्ञान, ग्राहक सेवा, पारदर्शी कामकाज, कर्ज वसुली, अग्रक्रम क्षेत्र आदी बाबतीत कोयना बँकेने अहवाल सालात उत्तम काम केले आहे. बँकेने सभासदांच्या गरजेप्रमाणे नवनविन ठेव व कर्ज योजना प्रस्तावित केल्या आहेत. बँकेच्या व्यवसाय वृद्धी करीता बँकेच्या विस्तारीत कक्षासह एकूण १२ शाखा कार्यरत असून संपूर्ण महाराष्ट्र राज्य सेवाकार्यक्षेत्र करण्याच्या दृष्ठीने बँकेने कार्यवाही सुरू असल्याची माहिती बँकेचे चेअरमन रोहित पाटील यांनी दिली.

कोयना सहकारी बँकेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मार्केट यार्ड, कराड येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थाना वरून बँकेचे चेअरमन रोहित पाटील बोलतहोते. यावेळी शिवनेरी शुगर्सचे संचालक व युना नेते अधिराज पाटील, रयत कारखान्याचे व्हा. चेअरमन आप्पासो गरूड, कोयना दूधसंघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, व्हा. चेअरमन शिवाजीराव जाधव, माजी चेअरमन संपतराव इंगवले, कराड तालुका सह. खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, व्हा. चेअरमन जगन्नाथ मोरे, माजी चेअरमन रंगराव थोरात, शामराव पाटील पतसंथेचे चेअरमन शहाजी शेवाळे, व्हा, चेअरमन सिद्धनाथ घराळ, माजी चेअरमन सर्जेराव थोरात, शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी चव्हाण, प्रा. धनाजी काटकर, सीए तानाजीराव जाधव, सी ए के एल सावंत, जि. प. सदस्य प्रदिपदादा पाटील, राजूभाई मुलाणी, पांडूरंग पाटील, महेश जाधव, बँकेचे सर्व संचालक तसेच कोयना-रयत समुहातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद यांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.

रोहित पाटील पुढे म्हणाले, कोअर बँकिंग प्रणाली सह ए टी एम (डेबीट कार्ड) सुविधा सुरू केली असून बँकेने युपीआय, आयएमपीएस सेवा सुरु केल्या आहेत. बँकेच्या ग्राहकांना घरी बसून मोबाईलवरून सर्व आर्थिक व्यवहार करता येणार असून बँकेच्या सभासद, खातेदार यांनी नजीकच्या शाखेत भेट देवून या अधुनिक सुविधांचा लाभ घ्यावा असे अवाहन केले.

गतवर्षाअखेर बँकेच्या ठेवी रु. १७७.४१ कोटी, कर्जे रु. ११५.११ कोटी, निधी रु.१५.८९ कोटी तर निव्वळ नफा रु.८६.७८ लाख एवढा झाला आहे. बँकेचे खेळते भांडवल २०७.२५ कोटी बँकेचा एकूण व्यवसाय २९२.५२ कोटी एवढा आहे. बँकेच्या संचालक मंडळाने चालू वर्षीही गतवर्षीप्रमाणे लाभांश (डिव्हीडंट) देणेची शिफारस केली आहे तसेच बँकेने आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत बेरोजगार तरूणांना व्याज परताव्याचा लाभ मिळवून दिला आहे. गतवर्षी बँकेने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तू देणेचा निर्णय घेतला असून ज्या सभासदांनी भेटवस्तू घेतलेली नाही त्यांनी आपल्या नजिकच्या शाखेत संपर्क साधून बँकेच्या भेटवस्तू घेणेत यावी असे अवाहन केले

सभेच्या सुरवातीला लोकनेते स्व. विलासकाका पाटील (उंडाळकर) यांच्या प्रतिमेचे पूजन करणेत येवून, अहवाल सालात देशातील राजकीय, सामाजिक, सहकार, कला, क्रिडा क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच बँकेचे सभासद, खातेदार, हितचिंतक त्याच प्रमाणे देशाचे रक्षण करताना शहीद झालेले वीर जवान यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणेत आली.

सभेचे प्रास्ताविक बँकेचे संचालक अविनाश पाटील यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी जनार्दन माने यांनी अहवाल वाचन केले. सभेचे सर्व विषय एकमताने मंजूर केले. बँकेचे तज्ञ संचालक सीए तानाजीराव जाधव व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सुनिल बोटलवार यांनी सभासदांना प्रशिक्षण दिले. यावेळी प्रा. धनाजी काटकर यांनी मनोगत व्यक्त केले. श्रद्धांजली ठराव संचालक जयवंत शिवे यांनी मांडला. यावेळी गुणवंत पाल्यांचा सभेमध्ये सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन बँकेचे उपाध्यक्ष विजय मुठेकर यांनी केले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक