कोयना दूध संघात उद्या विलासकाकांच्या पुतळ्याचे अनावरण...


 कोयना दूध संघात उद्या विलासकाकांच्या पुतळ्याचे अनावरण...

कराड, दि. 5 (प्रतिनिधी)- लोकनेते विलासकाका पाटील- उंडाळकर यांच्या आचार व विचारांची भावी पिढीला स्फूर्ती व प्रेरणा मिळावी, या उद्देशाने कोयना दूध संघाने संघाच्या प्रांगणात विलासकाकांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे अनावरण शुक्रवार, दि. ६ रोजी दुपारी ३ वाजता श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचे मठाधिपती पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते व पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती कोयना सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई यांनी दिली.

यावेळी दूध संघाचे व्हा. चेअरमन शिवाजीराव जाधव, कार्यकारी संचालक अमोल गायकवाड, बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी चव्हाण, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, व्हा. चेअरमन जगन्नाथ मोरे व कोयना दूध संघाचे संचालक उपस्थित होते. 

श्री. देसाई म्हणाले, कोयना सहकारी दूध उत्पादक प्रक्रीया संघाची स्थापना सन १९५७ साली सहकारमहर्षी आर. डी. पाटील यांनी केली. सन १९८५ सालापासून राज्याचे माजी सहकार मंत्री लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली दूध संघाने कोयना उपपदार्थांची निर्मिती करून आपला नावलौकीक करून ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. कोयना दूध संघाच्या प्रांगणात उभारण्यात येणाऱ्या विलासकाकांचा पूर्णकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ शुक्रवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी कोयना दूध संघाच्या प्रांगणामध्ये होत आहे. या समारंभ पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष, खा. नितीन जाधव-पाटील, कोयना दूध संघाचे मार्गदर्शक व प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 

या समारंभास काकाप्रेमी, काँग्रेस व रयत संघटनेतील कार्यकर्ते, संघाचे दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक, वितरक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन चेअरमन लक्ष्मण देसाई, व्हा. चेअरमन शिवाजीराव जाधव व कार्यकारी संचालक अमोल गायकवाड यांनी केले आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक