जुळेवाडीच्या सर्वांगीण प्रगतीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : डॉ. अतुल भोसले...

जुळेवाडी : रस्ता सुधारीकरण कामाचे भूमिपूजन करताना भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले...

जुळेवाडीच्या सर्वांगीण प्रगतीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : डॉ. अतुल भोसले...

जुळेवाडी, दि.3: महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघात पाणंद रस्त्यांसाठी ४५ कोटींचा निधी आणला आहे. येत्या काळात जास्तीत जास्त निधी आपल्या भागाला मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. तसेच जुळेवाडीच्या सर्वांगीण प्रगतीला चालना देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी केले. जुळेवाडी (ता. कराड) येथे रस्ता सुधारीकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. 

महाराष्ट्र शासनाच्या मनरेगा अंतर्गत अतिरिक्त राज्य कुशल निधीतून डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून जुळेवाडीत अंतर्गत रस्ता सुधारीकरण करण्यासाठी १० लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर झाला आहे. याचे भूमिपूजन डॉ. भोसले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

याप्रसंगी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, शासनाच्या विविध योजनांचा लाभ कराड दक्षिणमधील लाभार्थींना मिळवून देण्यासाठी आपले कार्यकर्ते झटत आहेत. शासनाच्या योजना प्रभावीपणे तळगाळात पोहचू लागल्याने काहीजणांना पोटशूळ उठला आहे. विरोधक या योजनांबाबत अपप्रचार करत आहेत. पण ग्रामस्थांनी त्याकडे लक्ष न देता या योजनांचा लाभ घ्यावा.

यावेळी जुळेवाडी येथील यशवंत काशीद, निशांत पाटील यांच्यासह अनेक युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. डॉ. अतुल भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. 

कार्यक्रमाला जुळेवाडीचे सरपंच नितीन बाकले, उपसरपंच सुभाष पाटील, ग्रामपंचायत सदस्य शुभम बाकले, अधिक सोमदे, अरविंद साळुंखे, महादेव सोमदे, धनाजी देशमुख, अधिक साळुंखे, जयवंतराव साळुंखे, पंजाबराव मोहिते, श्रीकृष्ण कुलकर्णी, दिनकर सावंत, आबा सावंत, रत्नाकर पाटील, विशाल गायकवाड, अक्षय कांबळे, पांडुरंग भोसले, दीपक कुंभार, विजय थोरात, अमरजीत पुजारी, गणेश कार्वेकर, संकेत पाटील, बिरदेव कोळी यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक