शिंदेवाडी-विंग येथे उद्या भव्य बांधकाम कामगार संमेलन...


शिंदेवाडी-विंग येथे शुक्रवारी भव्य बांधकाम कामगार संमेलन...

कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते लाभार्थींना होणार साहित्य वितरण...

कराड, दि.19: भारतीय जनता पार्टी कराड दक्षिणच्यावतीने शुक्रवारी (ता. २०) शिंदेवाडी – विंग येथे दुपारी तीन वाजता भव्य बांधकाम कामगार संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्याचे कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते पात्र लाभार्थींना साहित्य वितरण केले जाणार आहे. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले प्रमुख उपस्थित राहणार आहेत. 

बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून व महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोदंणीकृती बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य संच पेटीचे वितरण केले जाते. तसेच पात्र लाभार्थींना भांडी, तसेच बांधकाम कामगारांच्या मुलामुलींना शिष्यवृत्तीचे वितरण केले जाते. कराड दक्षिणमध्ये बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपातर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. भाजपा कामगार आघाडीच्या माध्यमातून अनेक पात्र लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी विशेष अभियानही राबविले जात आहे. 

या लाभार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून साहित्याचे वितरण राज्याचे कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते या बांधकाम कामगार संमेलनात केले जाणार आहे. तसेच यावेळी बांधकाम कामगारांच्या मुलामुलींना शिष्यवृत्तीचे वितरणही केले जाणार आहे. या कार्यक्रमाला कराड दक्षिणमधील बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा कामगार मोर्चाचे तालुकाध्यक्ष रुपेश देसाई यांनी केले आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक