कराड शहर डीबी पथकाने केले तडीपार इसमास जेरबंद...
कराड शहर डीबी पथकाने केले तडीपार इसमास जेरबंद...
कराड दि. 14-दोन वर्षासाठी तडीपार असलेला आरोपी पुन्हा शहर व परिसरात निदर्शनास आल्यानंतर कराड शहर पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्यास ताब्यात घेत कारवाई केली. निशिकांत निवास शिंदे (वय 23 वर्षे) रा. रेठरेकर कॉलनी, कराड असे या तडीपराचे नाव आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी आगामी गणेशउत्सव पाहता कराड शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना कराड शहरात तडीपार इसमांची माहिती काढून त्यांचेवर तात्काळ कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुषगाने वपानि के. एन. पाटील यांनी सहा. पोलीस निरीक्षक गणेश कड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक-ऑनल स्वामी.पो.कॉ. अमोल देशमुख, मुकेश मोरे. दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील. धिरज कोरडे. मोहसीन मोमीन यांची सदर कामगीरी साठी एक विशेष पथक म्हणून रचना केली होती.
दिनांक 14/09/2024 राजो वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदार मार्फत बातमी प्राप्त झाली को. मुजावर कॉलनीजवळ, रेठरेकर चौक, कराड येथे 2 वर्षाकरीता तडीपार असलेला इसम नाम- निशिकांत निवास शिंदे हा त्या ठिकाणी आला आहे त्याबाबत त्यांनी सहा. पोलीस निरीक्षक गणेश कड व पथकास माहिती देवून तात्काळ कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार सदर पथकाने मुजावर कॉलनी, रेठरेकर चौकात सापळा रचून मिळालं बातमी प्रमाणे तडीपार इसम नामे निशिकांत निवास शिंदे वय 23 वर्ष यास जागीच पकडले त्याबाबत कराड शहर पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री के. एन. पाटील सो. यांचे मार्गदर्शनाखाली पां. हवा. शशिकांत काळे करीत आहेत.
सदरची कार्मागरी मा. पोलीस अधीक्षक समीर शंख सो सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कड़कर सो. सातारा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. व मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील सो. कराड शहर पोलीस ठाणं यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक गणेश कड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक अनिल स्वामी. पो.कॉ. अमोल देशमुख, मुकश मोरे, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील. धिरज कोरडे. मोहसीन मोमीन यांनी केलेली आहे.

Comments
Post a Comment