कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई;रेकॅर्डवरील सराईत गुन्हेगारास अटक करुन 2 घरफोडी व 1 मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड...
कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई;रेकॅर्डवरील सराईत गुन्हेगारास अटक: 2 घरफोडी व 1 मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड...
कराड दि.11-कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, प्रफुल्ल गाडे, मोहित गुरव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करत असताना नांदगाव गावातील लोंकानी फोन करुन एक संशयीत इसम फिरत असल्याबद्दल माहिती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार नांदगाव गावात पोहचले.
त्यावेळी एक संशयीत इसम हा विना नंबरप्लेटचे मोटारसायकलवरुन जाताना दिसल्यानंतर त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे नाव विशाल संभाजी पवार (वय 25) वर्ष रा. उमराणी ता. जत जि. सांगली असे सांगितले व मोटारसायकलबाबत विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याबाबत रेकॉर्डवर खात्री केली असता त्याचेवर सांगली, सोलापुर नाशिक जिल्ह्याती चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याबाबत खात्री झाल्याने व त्याच्या ताब्यात एक हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल मिळून आलेने त्याचेवर कराड तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचेकडुन 60,000/- रु किंमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
त्याचबरोबर त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता तसेच रेकॉर्डवर खात्री केली असता त्याने सदर मोटारसायकल ही सातारा शहर पोलीस स्टेशन हद्दीतुन चोरी केल्याची तसेच त्याने कराड शहर पोलीस स्टेशन हद्दीत गत महिन्यात मंगळवार पेठेतील प्रसन्न मेडीकलचे दुकान फोडुन रोख रक्कम चोरी केले बाबत कबुली दिली. त्याबाबत कराड शहर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल असुन त्याने 8 दिवसापुर्वी शाहुवाडी पोलीस स्टेशन जि. कोल्हापुर येथील मेडीकल दुकान फोडुन चोरी केली असुन त्याबाबत गुन्हा दाखल करणेची तजवीज चालु असुन सदर रेकॉर्डवरील आरोपीस कराड शहर पोलीस स्टेशन यांचेडील घरफोडीच्या गुन्ह्यात ताब्यात दिले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हवा. नितीन येळवे हे करीत आहेत.
वरील कामगिरी पोलीस अधिक्षक समीर शेख तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप कराड तालुका पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली नांदगाव दुरक्षेत्रच्या सपोनि अर्चना शिंदे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, तानाजी बागल, प्रफुल्ल गाडे, मोहित गुरव, गणेश बाकले यांनी केली आहे.

Comments
Post a Comment