रेठरे बुद्रुकच्या पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार : डॉ. सुरेश भोसले...

रेठरे बुद्रुक : कृष्णा नदी घाट बांधकामाच्या शुभारंभप्रसंगी डॉ. सुरेश भोसले, आदित्य मोहिते, हणमंत सुर्यवंशी व इतर

रेठरे बुद्रुकच्या पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार : डॉ. सुरेश भोसले...

रेठरे बुद्रुक, ता. ३१ : संथ वाहणारी कृष्णा नदी, नैसर्गिक सौंदर्य लाभलेला परिसर आणि गावातील मंदिरांच्या देखण्या वास्तू असा वैविध्याने नटलेला परिसर लाभणे हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. कृष्णानदीच्या काठी संरक्षण भिंतीचे काम होत असताना, रेठरे बुद्रुकच्या पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. 

रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील सुकन्या राज्यसभेच्या माजी खासदार वंदना चव्हाण यांच्या विशेष फंडातून नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती घाट व पायऱ्या बांधकामासाठी तब्बल १ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या कामाच्या भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी युवा नेते आदित्य मोहिते, सरपंच हणमंत सूर्यवंशी, उपसरपंच भाग्यश्री पवार, सोसायटीचे चेअरमन व्ही. के. मोहिते, माजी जि. प. सदस्य शामबाला घोडके, माजी सरपंच सुवर्णा कापूरकर, बबन दमामे, माजी उपसरंपच शिवाजीराव दमामे, सुनिल पवार, जयवंतराव साळुंखे, राजीव मोहिते, बाळासाहेब मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. भोसले पुढे म्हणाले, गावातील सांडपाणी, घनकचरा यावर प्रक्रिया करून त्याचा पुर्नवापर करण्यासाठी योजना हाती घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय बंद झालेली सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा सुरू करण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील लोकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. गावाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करुया.

यावेळी हणमंत सूर्यवंशी, व्ही. के. मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संजय पवार, आबा मोहिते, बापूराव मोहिते, राहुल मोहिते, एम. के. मोहिते, विलास धर्मे, संजीवनी कार्वेकर, मंथन शेवाळे यांच्यासह ग्रा. पं. व सोसायटी सदस्य, ग्रामस्थ, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. संतोष मोहिते यांनी आभार मानले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक