कृष्णा हॉस्पिटलमध्ये ‘रिपिटेटीव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटीक स्टिम्युलेटर’ प्रणाली दाखल...


कृष्णा हॉस्पिटलमध्ये ‘रिपिटेटीव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटीक स्टिम्युलेटर’ प्रणाली दाखल...

मानसिक आजारांवरील उपचारांमध्ये ठरणार फायदेशीर...

सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच कृष्णा हॉस्पिटलमध्ये ही प्रणाली उपलब्ध...

कराड, दि.24: येथील कृष्णा हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागात ‘रिपिटेटीव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटीक स्टिम्युलेटर’ ही अत्याधुनिक प्रणाली दाखल झाली आहे. नैराश्य आणि इतर मानसिक आजारांवरील उपचारांमध्ये, या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरणार आहे.

ग्रामीण भागातील रुग्णांना माफक दरात उच्च वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटल नेहमीच प्रयत्नरत राहिले आहे. अलीकडे समाजात बलदत्या जीवनशैलीमुळे नैराश्य आणि ओ.सी.डी. म्हणजेच ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर यासारख्या मानसिक आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. ओ.सी.डी. हा गंभीर मानसिक आजार असून, यामध्ये रुग्णाच्या मनात सातत्याने एकाच प्रकारचे विचार येऊ लागतात. यासारख्या आजारांवरील उपचारात ‘रिपिटेटीव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटीक स्टिम्युलेटर’ ही अत्याधुनिक प्रणाली अधिक फायदेशीर ठरते.

जगभरात वापरले जाणारे आणि यू.एस. फूड ॲन्ड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनतर्फे मान्यताप्राप्त असलेले रशियन बनावटीचे हे मशिन कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे. या अत्याधुनिक मशिनरीमुळे मानसिक आजारांच्या उपचारांत चांगला फरक पडू शकतो. या उपचारात मेंदूच्या विशिष्ट भागांना चुंबकीय पद्धतीने उत्तेजित केले जाते. याचा एक मोठा फायदा असा, की हे उपचार रुग्ण ओपीडीच्या आधारावर घेऊ शकतात आणि घरी अथवा कामाच्या ठिकाणी त्यांचे नियमित कार्य करु शकतात. तरी संबंधित रुग्णांनी कृष्णा हॉस्पिटलमधील मानसोपचार विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच...

भारतातील काही मोजक्याच हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणारी ही अत्याधुनिक प्रणाली; सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाल्याने या भागातील रुग्णांचा याचा मोठा लाभ होणार आहे. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये ही उपचार सेवा पात्र रुग्णांना मोफत उपलब्ध होणार आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक