आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड दक्षिणेतील २२ किलोमीटर रस्त्यांना दर्जोन्नती...

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड दक्षिणेतील २२ किलोमीटर रस्त्यांना दर्जोन्नती...

कराड दि. 20-कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विकासाचे मार्ग भक्कम करणारे नेतृत्व अशी ओळख असणाऱ्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून मतदारसंघातील २२ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांना दर्जोन्नती मिळाली आहे. आ. चव्हाण यांनी विकासाचे हे आणखी एक पाऊल उचलले असल्याने त्यांच्या कार्याबद्दल कौतुक होत आहे. 

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी १४ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देवून ग्रामीण मार्गांची दर्जोन्नती करण्याबाबतची मागणी केली होती. त्यावेळेस त्यांनी मागणी केलेल्या रस्त्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने राज्य शासनाने सादर केला होता. सदर प्रस्तावामध्ये मागणीकृत रस्त्यांकरिता भूसंपादनाची आवश्यकता नसल्याचे व सदरहू रस्ते वन जमिनीतून जात नसल्याचे नमूद केले आहे. तसेच आ. चव्हाण यांच्या मागणीवरून जिल्हा परिषदेने सदरच्या रस्त्यांची मागणी असणारा प्रस्ताव दाखल केला. 

सदर रस्त्यावरील गावांची संख्या, रस्त्यांचा होणारा वापर तसेच जिल्हा परिषदेचा ठराव विचारात घेवून खालील ग्रामीण मार्ग रस्ते इतर जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामध्ये धानाई मंदिर - गोपाळनगर - शिंदेवस्ती - मोळाचा ओढा - वडगाव हवेली - थोरातमळा व्हाया केळबावी (शेरे) हा ११ किलोमीटर व गणेशनगर - वडगाव हवेली ते राज्य मार्ग १४२ ते कार्वे शिव - थोरातमळा रस्ता हा ११ किलोमीटर रस्ता असे एकूण २२ किलोमीटर रस्त्याची दर्जोन्नती करण्यात आली आहे.

या रस्त्यांमुळे शेतीतील वहिवाट आणखी सुखकर होणार आहे. या रस्त्यांमुळे कार्वे, वडगाव हवेली, शेरे या गावातील शेकडो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. याबद्दल आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कृष्णाकाठी असलेल्या गावातील ग्रामीण मार्गांची इतर जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती केली आहे. याच अनुषंगाने आ. चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना या विभागात कार्वे नाका ते कार्वे चौकी या रस्त्याचे चौपदरीकरण केले. या कामामुळे गोळेश्वर व कार्वे येथील लोकांचा आर्थिक विकास झाला. याची आठवण या निमित्ताने होते.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक