कराड विमानतळा नजीकचा वारुंजी येथील बहुचर्चित टॉवर प्रशासनाने उतरवला...

 


कराड विमानतळा नजीकचा वारुंजी येथील बहुचर्चित टॉवर प्रशासनाने उतरवला...

कराड दि.28-(प्रतिनिधी) वारुंजी येथील विमानतळाच्या लगत असणाऱ्या बहुचर्चित टॉवरची उंची कमी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्यानंतर प्रांत अधिकारी अतुल मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कंपनीला याबाबत सूचना दिल्याने अखेर त्या टॉवरची उंची कमी करण्यात आली आहे.

वारुंजी येथे विमानतळ नजीक इंडस मोबाईलचा टॉवर उभा केला आहे. सदर टॉवर विमानतळ नजीक असल्याने त्यांनी विमानतळ प्राधिकरणाचा ना हरकत दाखला घेणे बंधनकारक असतानाही, विमानतळ प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता संबंधित टॉवर उभा केला होता. विमानतळ प्राधिकरणाने यापूर्वी विमानतळा परिसरातील उंचीच्या बांधकामाबद्दल तसेच टॉवर बद्दल सूचित केले होते. तरीही नियमांचे उल्लंघन करून हा टॉवर उभा करण्यात आला होता. याबाबत प्राधिकरणाने प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर संबंधित टॉवर पाडण्याच्या आदेश जिल्हाधिकारी यांनी यापूर्वीच दिले होते. मात्र त्यानंतर झालेल्या अंतर्गत हालचालीमुळे जिल्हा प्रशासनाने नुकतेच नवे आदेश जारी केले होते.

दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार कराडचे प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांनी टॉवर उतरवण्याबाबत संबंधित कंपनीला सूचित केले होते. त्याशिवाय विद्युत पुरवठा कंपनीलाही टॉवरचा वीज पुरवठा खंडित करण्याबाबत सूचना दिली होती. त्यानंतर संबंधित टॉवर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सदर टॉवरची उंची कमी केली. साधारण 50 मीटर उंचीचा असणाऱ्या या टॉवरची उंची 20 मीटरने कमी करण्यात आली आहे.

कराड उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार गटविकास अधिकारी प्रताप पाटील, विस्तार अधिकारी दिपसागर पोतदार, ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत वारुंजी एस के मुल्ला, वारुंजी गाव कामगार तलाठी  ए. के.सुतार यांनी कारवाई करत संबंधित टॉवरची उंची कमी करण्या बाबत कारवाही केली.

दरम्यान यापूर्वीच विमानतळ प्राधिकरणाने सूचित केल्यानुसार विमानतळ परिसरात कोणीही नियमांचे उल्लंघन करू नये तसेच दिलेल्या नियमानुसार इमारतींचे बांधकाम करावे अन्यथा अशा प्रकारच्या कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक