कराड अर्बन बँकेच्या तळभाग शाखेतून वाहन वितरण...
कराड अर्बन बँकेच्या तळभाग शाखेतून वाहन वितरण...
कराड, दि.12- दि कराड अर्बन को-ऑप. बँक लि., कराडच्या तळभाग शाखेतून वाहन तारण कर्ज घेतलेल्या ग्राहकांना बँकेचे महाव्यवस्थापक सलीम शेख यांच्या हस्ते वाहने वितरीत करण्यात आली. यावेळी बँकेचे उपमहाव्यवस्थापक अतुल शिदे, तळभाग शाखेचे व्यवस्थापक सुर्यकांत जाधव, उपमहाव्यवस्थापक महेश पाठक, अधिकारी राजेंद्र शिंदे आणि सेवक उपस्थित होते.
कराड अर्बन बँक ग्राहकांना फक्त आर्थिक पतपुरवठा करत नाही तर योग्य सल्ला देवून आर्थिक शिस्तसुद्धा लावते, यामुळे ग्राहकांना आर्थिक प्रगती करणे सोपे जाते. कराड अर्बन बँक नेहमीच सर्वोत्तम ग्राहक सेवा देत आली असल्याचे समाधान ग्राहकांनी व्यक्त केले.

Comments
Post a Comment