संजीवन मेडिकल सेंटरचे मेडिकल डायरेक्टर डॉ. विजयसिंह पाटील यांचा जन्मदिवस प्रेरणादिन म्हणून साजरा..
संजीवन मेडिकल सेंटरचे मेडिकल डायरेक्टर डॉ. विजयसिंह पाटील यांचा जन्मदिवस प्रेरणादिन म्हणून साजरा..
कराड दि.3- येथील संजीवन मेडिकल सेंटरचे मेडिकल डायरेक्टर डॉ. विजयसिंह पाटील यांचे आजपर्यंत समाजासाठीचे असलेले योगदान विचारात घेता त्यांचा जन्मदिवस प्रेरणादिन म्हणून साजरा करण्यात आला. सेंटरचे डॉ. दिलीप सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्टाफने डॉ. पाटील यांच्या विचारांची जोपासना करण्यासाठी त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविला. या उपक्रमामध्ये मेडिकल सेंटरचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले.
संजीवन मेडिकल सेंटरमुळे आज पश्चिम महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती घडली आहे. या सेंटरच्या माध्यमातून अनेक गुंतागुंतीच्या किचकट शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामुळे अनेकांना जीवदान मिळाले आहे. याचबरोबर सर्वसामान्य रुग्णांना मोठा आधार या सेंटरने देण्याचे काम केले आहे. तसेच गरिब रुग्णांना विविध योजनांच्या माध्यमातून उपचार, अनेक शिबिरांमधून आरोग्य तपासणी, उपचार, मार्गदर्शन दिले. यापाठीमागे डॉ. विजयसिंह पाटील यांचे मोलाचे योगदान आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे समाजात हृदयविकार, मेंदूचे विकार, कॅन्सर, किडनी, स्त्री रोग, नेत्ररोग, अस्थीरोग आदी विकारांचे प्रमाण वाढत चलले आहे. यामुळे निरोगी आरोग्याचे महत्व हे समाजाला पटवून देणे तसेच एक सशक्त समाज राहण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा या उद्देशाने डॉ. विजयसिंह पाटील कार्यरत आहेत. समाजातील वंचित घटकांसाठीही सवलतीच्या दरात, तसेच काही ठिकाणी मोफत आरोग्यसेवाही डॉ. पाटील यांनी दिली असल्यामुळे आज संजीवन मेडिकल सेंटरबाबत जनसामान्यात आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात कोठेही न होणारी टावीसारखी शस्त्रक्रिया ही डॉ. विजयसिंह पाटील यांनी नव्वद वषय रुग्णांवर यशस्वीरित्या पार पाडली आहे. याचबरोबर दोन दिवसाच्या बालकाची हृदयशस्त्रक्रीया ही यशस्वी केली. हृदयाशी संबंधीत अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सहजरित्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. तसेच रुग्णांना गरज असले तर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो अन्यथा औषधी उपचार करून रुग्ण बरे केले जात असल्यामुळे डॉ. पाटील यांचे प्रसिध्दी होत आहे.
डॉ. विजयसिंह पाटील यांचा जन्मदिवस हा मेडिकल सेंटरचा सर्व स्टाफ व रुग्णांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी मेडिकल सेंटरचे चेअरमन डॉ. राजाराम पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. योगिता पाटील, डॉ. दिलीप सोळंकी, स्वप्नील साळुंखे व सर्व स्टाफ आदींनी डॉ. पाटील यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Comments
Post a Comment