कराडात ईदगाह ट्रस्ट आयोजित आरोग्य शिबिर उत्स्फूर्त प्रतिसाद...

 

कराडात ईदगाह ट्रस्ट आयोजित आरोग्य शिबिर उत्स्फूर्त प्रतिसाद...

कराड दि.5 (प्रतिनिधी) राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व शाही वक्फ कब्रस्तान ईदगाह ट्रस्ट कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महिला व बालकांसाठीच्या आरोग्य शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. हे शिबिर मक्का मशिद येथील हाजी ताजुद्दीन भादी (काका) हॉलमध्ये घेण्यात आले होते.

सध्या पावसाळा सुरू असून विविध प्रकारचे आजार उद्भवत असतात. त्यामुळे कोणत्याही आजारावर त्वरित उपचार मिळावेत. योग्य वेळेत आजारांचे निदान व्हावे. या अनुषंगाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शाही वक्फ कब्रस्तान ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष हाजी जैनुद्दीन भादी, नागरी आरोग्य केंद्राच्या डॉ. शीतल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या शिबिरास प्रारंभ करण्यात आला.

या शिबिरात परिसरातील नागरिक तसेच महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणी केली तसेच लहान बालकांची तपासणी ही दुपारच्या सत्रात करण्यात आली. शिबिर यशस्वी करण्यासाठी शाही वक्फ कब्रस्तान ईदगाह ट्रस्टचे पदाधिकारी व नागरी आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. 

यावेळी हाजी मजरभाई कागदी, मज्जिद आंबेकरी, साबीरमिया मुल्ला, रफिक मुलानी यांच्यासह नागरी आरोग्य केंद्राच्या लॅब टेक्निशियन अनिता पवार, अकाउंटंट अल्लीयून्नीसा कादरी, आरोग्य सेविका मेघना नलवडे, शुभांगी थोरात, आरोग्य सेवक अरविंद काळे मोहनिश कांबळे, अशा सेविका साधना कुंभार, हलीमा मुल्ला भाग्यश्री कोळेकर, आश्लेषा कांबळे, निहाल नदाफ, कविता जाधव, वनिता कांबळे हे उपस्थित होते.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक