धोंडेवाडी येथे डॉ. अतुलबाबा भोसलेंच्या हस्ते ४० लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन....

धोंडेवाडी : विकासकामांचे भूमिपूजन करताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले.

धोंडेवाडी येथे डॉ. अतुलबाबा भोसलेंच्या हस्ते ४० लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन....

कराड, दि.३ : महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून धोंडेवाडी (ता. कराड) येथे एकूण ४० लाख रुपयांची विकासकामे मंजूर झाली आहेत. या विकासकामांचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

धोंडेवाडी (ता. कराड) येथे डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून भाजपा-महायुती सरकारच्या माध्यमातून ४० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत माळवाडी धनगर / कुडमुडे समाज माळवाडी वेताळबा विंग रस्ता ते पोपट भोसले ओढ्यापर्यंत गटर व रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख), धनगर वस्ती (दळेवाडी) येथे आर.सी.सी. गटर व रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख), महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत गावात सिमेंट रस्ता / पेव्हर ब्लॉक बसविणे (१० लाख) आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या निधीतून अंतर्गत रस्ते सुधारणेसाठी (१० लाख) एकूण ४० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या विकासकामांचे भूमिपूजन डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. 

यानंतर झालेल्या सभेच्या व्यासपीठावर य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, धोंडिराम जाधव, दयानंद पाटील, सरपंच रेखा काकडे, उपसरपंच कविता शेडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, या भागात विविध संस्थांच्या माध्यमातून गेली ५० वर्षे आपण अनेक प्रकारची विकासकामे केली आहेत. गेल्या काही वर्षात तर डॉ. अतुलबाबांनी कुठल्याही सत्तापदावर नसताना राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यवधींचा विकासनिधी खेचून आणला आहे. भविष्यात जर संधी मिळाली तर या भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपापसातील मतभेद विसरुन डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे.

यावेळी ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आमदार आनंदराव पाटील, धोंडिराम जाधव, सुरेश चौगुले, उत्तम गलांडे, सचिन काकडे यांचीही भाषणे झाली. यावेळी कुलदीप निकम, ग्रामपंचायत सदस्य संगीता जानकर, अनिता पवार, सुगंधा पवार, प्रल्हाद येडगे, सदाभाऊ देसाई, किसनराव देसाई यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धोंडेवाडी सरपंचांसह सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश...

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या समर्थक धोंडेवाडीच्या सरपंच रेखा काकडे, ग्रामपंचायत सदस्य अनिता पवार, सुगंधा पवार, योगेश खरात, माजी सरपंच विजय ताटे, माजी उपसरपंच शरद पवार, राजेंद्र पवार, विजय कदम, संतोष पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. डॉ. सुरेश भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. 


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक