कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई; अभिलेखावरील 2 सराईत गुन्हेगारास अटक...
कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई; अभिलेखावरील 2 सराईत गुन्हेगारास अटक...
घरफोडी व मोटारसायकल चोरीचे 5 गुन्हे केले उघड...
कराड दि. (प्रतिनिधी) कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने तालुक्यातील दुशेरे व तुळसण येथील रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगारांना अटक करून पाच गुन्हे उघडकीस आणले आहे. या सराईत गुन्हेगाराकडून घरफोडीचे दोन व मोटरसायकल चोरीचे तीन असे पाच गुन्हे उघड करून मोटरसायकली सह मुद्देमाल जप्त करीत दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दिनांक 02/07/2024 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, प्रफुल्ल गाडे, प्रदीप धस हे कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना दुशेरे गावातील लोकानी फोन करुन एक संशयीत चोरटा पकडला असल्याचे कळवले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार दुशेरे गावात पोहचले असता सदर संशयीत हा रेकार्डवरील गुन्हेगार असलेचे लक्षात येतात त्यास ताब्यात घेतले. सदर आरोपीकडे कसुन चौकशी केली असता त्याने कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीचे 2 गुन्हे केले असल्याचे कबुली दिली.
याबाबत कराड तालुका पोलीस ठाणे येथे मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असुन गुन्हयात आरोपी आकाश ऊर्फ दिग्वीजय बापु लाडे रा. दुशेरे यास अटक करुन 40,000/- रु किंमतीच्या 2 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. सदर आरोपीस दिनांक 04/07/2024 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेतली असुन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार सज्जन जगताप पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांना कोळेवाडी येथुन माहिती मिळली की दिनांक 03/07/2024 रोजी कोळेवाडी ता. कराड येथुन रेकार्ड वरील आरोपी दत्तात्रय किसन यादव रा. तुळसण ता. कराड हा आला आहे. त्यास मोटारसायकलवरुन पळुन जाताना पाठलाग करुन पकडले. त्याच्या ताब्यातील एच एफ डिलक्स मोटारसायकलची इंजिन व चेसी नंबर वरुन खात्री केली असता सदर मोटारसायकल ही कराड शहर पोलीस स्टेशन हद्दीतुन सैदापुर कॅनॉल वरुन चोरीस गेलेली असुन तिचा क्रमांक MH 50 F 3925 असा आहे.
यावेळी दोन पंचासमक्ष सदर मोटरसायकल जप्त करुन ताब्यात घेतली आहे. या आरोपीने कोळेवाडी येथे दि.04/05/2024 रोजी घरफोडी करुन 50 किलो वजनाची ज्वारीची 6 पोती तसेच कोडोली ता. कराड येथे घरफोडी करुन चोरी केलेले 100 किलो वजनाची गव्हाची 2 पोती अशा दोन घरफोडी केल्याचे कबुली दिली आहे. त्यासाठी त्याने त्याची वापर केलेली स्प्लेंडर प्लस मोटारयकल MH 50 T 3035 ही जप्त करण्यात आली आहे. या आरोपीकडून एकुण 75,000/- रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर आरोपीस दि.03/07/2024 रोजी अटक करण्यात आली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हवा. नितीन कुचेकर हे करीत आहेत.
वरील कामगिरी पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आचंल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, कराड तालुका पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अर्चना शिंदे, सपोनि अभिजीत चौधरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, प्रफुल्ल गाडे, प्रदीप धस यांनी केली आहे.

Comments
Post a Comment