कराडात उद्या बकरीद ईदची सामुदायिक नमाज होणार नाही...
कराडात उद्या बकरीद ईदची सामुदायिक नमाज होणार नाही...
कराड दि.17 (प्रतिनिधी) शहरात सायंकाळी पावसाने सुरुवात केल्याने कराडच्या ईदगाह मैदानावर बकरीद ईद निमित्त होणारी सामुदायिक नमाज (प्रार्थना) होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शहर व परिसर तसेच ग्रामीण भागातील मूस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर येऊ नये असे आवाहन शाही वक्फ कब्रस्तान ईदगाह कराड कडून करण्यात आले आहे.
कराड शहर तसेच ग्रामिण भागातील सर्व मुस्लिम बांधवानी ईदगाह मैदानावर न येता आपआपल्या नजीकच्या मस्जिदमध्ये नमाज अदा करावी. पावसाचे वातावरण असल्यामुळे सोमवार दि. 17 जून रोजी ईद उल- अजहा (बकरीद ईद) ईदची नमाज "ईदगाह" मैदानावर होणार नाही. त्यामुळे मूस्लिम बांधवानी ईदगाह मैदानावर येण्याचा प्रयत्न करू नये अशी विनंती सर्व मुस्लिम बांधवाना शाही वक्फ कब्रस्तान ईदगाह,कराड यांच्याकडून करण्यात आली आहे.
दरम्यान उद्या होणाऱ्या सामुदायिक नमाज पठनासाठी शाही वक्फ कब्रस्तान ईदगाह व कराड नगरपरिषदे कडून गेली दोन दिवस इतका मैदानावर तयारी करण्यात आली. मैदानावरील कचरा साफ करून तसेच गवत काढून आज रेषा ही आखण्यात आल्या होत्या. मात्र दुपारनंतर पावसाचे वातावरण तयार झाले व सायंकाळी पावसाने सुरुवात केली त्यामुळे ईदगाह मैदानावर उद्या होणारी सामुदायिक प्रार्थना रद्द करण्यात आली असल्याची सूचना शाही वक्फ कब्रस्तान ईदगाह कडून करण्यात आली आहे.



Comments
Post a Comment