कराडच्या शासकीय तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु;२५ जून पर्यंत स्वीकारणार अर्ज...


राडच्या शासकीय तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु;२५ जून पर्यंत स्वीकारणार अर्ज...
कराड दि.5 शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी डिप्लोमा (पदविका) प्रवेशाला दिनांक २९ मे, २०२४ पासून सुरुवात झालेली असून पहिल्याच टप्प्यामध्ये पालक व विद्यार्थी वर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. सदर प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत (CAP) पद्धतीने राबवली जात असून विद्यार्थ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील तंत्रनिकेतनांसाठी एकच अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावयाचा आहे. हा अर्ज विद्यार्थी https://poly24.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावरती किंवा DTE- Diploma Admission या App मधून लॅपटॉप, संगणक अथवा मोबाईलद्वारे देखील भरू शकतो. अशी माहित प्र. प्राचार्य डॉ. के.एम. बागवान यांनी आज पत्रकर परिषदेत दिली.

सातारा जिल्हा तसेच कराड व आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतन, कराड येथे प्रवेश प्रक्रियेचे सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तसेच सातारा जिल्ह्यात एकूण ११ सुविधा केंद्र (Facilitation Centres) उपलब्ध आहेत.

कराडचे शासकीय तंत्रनिकेतन मध्ये सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन, इंस्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल व मेकॅट्रॉनिक्स हे अभ्यासक्रम शिकविले जातात. संस्थेतील इलेक्ट्रिकल व कॉम्प्युटर या अभ्यासक्रमांना राष्ट्रीय पातळीवरील NBA मानांकन प्राप्त झाले आहे. संस्थेतील सर्व अभ्यासक्रमांकरिता पात्र विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहेत.

संस्थेचे प्र. प्राचार्य डॉ. के.एम. बागवान यांनी संस्थेमध्ये अल्पसंख्यांक प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन व मेकॅनिकल या अभ्यासक्रमांच्या स्वतंत्र तुकड्या उपलब्ध असून अल्पसंख्यांक प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के जागा राखीव असतात या बाबत माहिती दिली. तसेच प्रवेश प्रकीयेच्या महत्वाच्या टप्प्याविषयी मार्गदर्शन केले. उप प्राचार्य श्रीमती जयश्री पाटील यांनी तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी विषयी बहुमोल मार्गदर्शन केले. या नंतर श्रीमती एस. जे. माने यांनी संपूर्ण प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांचे सादरीकरण केले.

विद्यार्थ्याकरिता सुसज्ज प्रयोगशाळा व संगणक, इंटरनेट सुविधा, सर्व शाखेत तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग, जिमखाना तसेच क्रीडा स्पर्धा, विद्यार्थिनी करिता वेगळी कॉमन रूम, अद्यावत ग्रंथालय सुविधा, विद्यार्थी सहकारी भांडार, परिसर व विद्यार्थी सुरक्षेसाठी सिक्युरिटी गार्ड व वाहन पार्किंगसाठी वाहनतळ उपलब्ध आहे. तसेच विद्यार्थ्यासाठी २४० व विद्यार्थीनीसाठी १६० क्षमतेचे स्वतंत्र वसतिगृह उपलब्ध आहे.

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना Campus Interview द्वारे नामवंत कंपन्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरीची संधी उपलब्ध होते. तसेच पदविका (डिप्लोमा) पूर्ण झाल्यावर विद्यार्थी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रीकी पदवीस प्रवेश घेण्यासाठी पात्र होतात.

कराड परिसरामध्ये उपलब्ध असलेल्या या सुविधा केंद्राचा लाभ विद्यार्थी व पालक यांनी करून घेण्याचे आवाहन संस्थेचे प्र. प्राचार्य डॉ. के. एम. बागवान, प्रवेश समितीचे अध्यक्ष प्रा. रजनीश पिसे, सल्लागार प्रा. आनंद पेंढारकर व उपाध्यक्ष श्रीमती प्रा.ज.ल. गावंडे यांनी केले. प्रवेश प्रक्रियेबाबत काही शंका असल्यास विद्यार्थी व पालकांनी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रा. स्वाती साळवे यांनी केले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक