जयवंत शुगर्समध्ये मिल रोलर पूजन उत्साहात....

धावरवाडी : ‘जयवंत शुगर्स’च्या मिल रोलरचे पूजन करताना संस्थापक डॉ. सुरेश भोसले.

जयवंत शुगर्समध्ये मिल रोलर पूजन उत्साहात....

कराड, दि 3: धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्यात येत्या गळीत हंगामासाठी संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी ‘जयवंत शुगर्स’चे सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर, उपसरव्यवस्थापक (टेक्निकल) आर. आर. इजाते, सरव्यवस्थापक (फायनान्स) व्ही. आर. सावरीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

धार्मिक विधी झाल्यानंतर डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी ‘जयवंत शुगर्स’चे चीफ इंजिनिअर एच. एम. नदाफ, चिफ केमिस्ट बी. जी. चव्हाणके, सिव्हिल इंजिनिअर एस. एच. शेख, डिस्टीलरी मॅनेजर व्ही. जी. म्हसवडे, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर ए. बी. खटके, मुख्य शेतकी अधिकारी आर. जे. पाटील, प्रशासकीय अधिकारी आर. टी. सिरसाट, ई.डी.पी. मॅनेजर ए. एल. काशीद, एच. आर. मॅनेजर एस. एच. भुसनर, पर्चेस ऑफिसर पी. एस. जाधव, मटेरियल मॅनेजर जी. एस. बाशिंगे, सेफ्टी ऑफिसर एस. व्ही. शिद, असि. सेल्स ऑफिसर वैभव मोहिते यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक