‘कृष्णा’त पत्नीने पतीला; वडिलांनी मुलाला दिले जीवदान!

कराड : यशस्वी किडनी प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांना व किडनी दात्यांच्या डिस्चार्जप्रसंगी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले...

 ‘कृष्णा’त पत्नीने पतीला; वडिलांनी मुलाला दिले जीवदान!

कृष्णा हॉस्पिटलमध्ये २ रुग्णांवर यशस्वी किडनी प्रत्यारोपण; रुग्ण व दात्यांना डिस्चार्ज

कराड, दि. २७ : कराड येथील एका सहकारी पतसंस्थेत नोकरी करणाऱ्या ४३ वर्षीय रुग्णावर आणि कोल्हापूर जिल्ह्यात सेंट्रींग काम करुन आपली गुजराण करणाऱ्या एका ३८ वर्षीय रुग्णावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. कराड येथील रुग्णाला त्याच्या पत्नीने; तर कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णाला त्याच्या ६२ वर्षीय वडिलांनी किडनी दान करुन जीवदान दिले. या रुग्णांना आणि किडनी दात्यांना कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. 

कराड शहरालगत एका गावामध्ये राहणारे ४३ वर्षीय कैलास (नाव बदलले आहे) एका सहकारी पतसंस्थेत नोकरी करतात. गेल्या वर्षभरापासून त्यांना मळमळ, उलट्या, जास्त प्रमाणात चक्कर येणे, वजन कमी होणे असा त्रास होऊ लागला होता. अधिक तपासण्या केल्या असता, त्यांच्या किडनीला संसर्ग झाल्याचे निदान झाले. कालांतराने तपासण्या केल्यानंतर त्यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे किडनी प्रत्यारोपणासाठी त्यांनी कराडसह कोल्हापूर, पुणे येथे जाऊन वैद्यकीय सल्ला घेतला. पण घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे किडनी प्रत्यारोपणाचा खर्च त्यांना पेलवणारा नव्हता. अशावेळी कृष्णा हॉस्पिटलमध्ये अतिशय यशस्वीपणे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती त्यांना वर्तमानपत्रातील बातमीवरुन समजली आणि या कुटुंबांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात राहणारे ३८ वर्षीय प्रशांत (नाव बदलले आहे) सेंट्रींगचे काम करतात. त्यांना गेले २ वर्षे किडनीचा त्रास होत होता. त्यांचे वडिल शेती करतात. या रुग्णालाही किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आल्याने, ते हवालदिल झाले होते. किडनी प्रत्यारोपणासाठीचा खर्च कसा उभा करायचा, या विवंचनेत असताना त्यांनाही कृष्णा हॉस्पिटलमध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती मिळाली. 

या दोन्ही कुटुंबांनी कृष्णा हॉस्पिटलमधील किडनी ट्रान्सप्लान्ट विभागाला भेट दिली. तिथे असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. वैशाली यादव यांनी या संपूर्ण प्रक्रियेची आणि उपचारांबद्दलची माहिती त्यांच्या कुटुंबांला दिली. त्यानुसार त्यांनी कृष्णा हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. 

कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कृष्णा हॉस्पिटलमधील किडनी प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख तथा मेडिकल ॲडमिनीस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर यांच्या निर्देशानुसार किडनी ट्रान्स्प्लान्ट सर्जन डॉ. अमोलकुमार पाटील, युरॉलॉजिस्ट डॉ. योगेश जाधव, नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. राहुल पाटील या तज्ज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय टीमसह अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने या दोघांवर उपचार सुरु झाले. कैलास यांच्या किडनीशी पत्नीची आणि प्रशांत यांच्या किडनीशी वडिलांची किडनी जुळली आणि या दोघांनी आपली किडनी दान करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार कृष्णा हॉस्पिटलमध्ये या दोन्ही रुग्णांवर किडनी ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. 

चौघांचीही प्रकृती उत्तम आहे. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया झाल्याने किडनी दात्यांना तिसऱ्याच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. तर रुग्णांना आज ११ व्या दिवशी डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा हॉस्पिटलने माफक दरात ही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली असून, आत्तापर्यंत ३१ किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हॉस्पिटलने यशस्वीपणे केल्या आहेत. यासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक साधने आणि तज्ज्ञ डॉक्टर्स व अन्य स्टाफ येथे उपलब्ध आहे. 

राजू सनदी कराड 

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक