मलकापूर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी निर्मला वीर तर सेक्रेटरी पदी चित्रा रामदुर्गकर यांची निवड...


मलकापूर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी निर्मला वीर तर सेक्रेटरी पदी चित्रा रामदुर्गकर यांची निवड...

कराड दि.14 मलकापूर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी निर्मला वीर तर सेक्रेटरी पदी चित्रा रामदुर्गकर यांची निवड करण्यात आली. याशिवाय नवीन वर्षाच्या कार्यकारणी संचालकपदी आय पी पी पूजा वखारिया, उपाध्यक्षपदी वैशाली पाटील, खजिनदार छाया शेवाळे,  संपादक वैशाली लक्ष्मण पाटील तसेच सी. सी. प्रमोदिनी मोहिते सल्लागार समितीमध्ये सुनीता यादव, वैदेही कुलकर्णी, स्मिता औंधकर, संजीवनी यादव, अंजना जाधव, पल्लवी पाटील यांची निवड करण्यात आली.

इनरव्हील ही संस्था जागतिक स्तरावर ती काम करणारी संस्था आहे. ही संस्था समाजातील वंचित घटकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. या संस्थेला शंभर वर्षाचा इतिहास असून फक्त महिला ही संस्था चालवतात. इनरव्हील क्लब मलकापूरने विविध सामाजिक कामे आज पर्यंत केलेली आहेत. कोयना नगर, आंबेगाव लँड स्लाइडिंगला मदत करण्यात आली. वेश्या वस्तीमध्ये रक्षाबंधन दिवशी विविध उपक्रम करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या तसेच ऊसतोड कामगार महिलांसाठी काम केले. जिथे बिल्डिंगची काम चालू असतात व बरेच बाहेर राज्यातील मुलं असतात त्यांच्यासाठी आभाळमाया ही शाळा चालवली गेली. शैक्षणिक व आर्थिक मदत शाळांच्या पर्यंत पोहोचवण्यात आली .शाळेतील मुलांसाठी विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले. शाळेमध्ये मुलांसाठी शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना फी भरण्यामध्ये मदत करण्यात आली.

2024-2025 या वर्षीच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉक्टर शोभना पालेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर क्लब सतत कार्य करत राहील. समाजातील विविध वंचित घटकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. आपल्या आजूबाजूला जी काय गरज असेल त्या गरजेनुसार काम करण्यासाठी तत्पर सेवा देण्यासाठी इनरव्हील क्लब मलकापूर नेहमीच सदैव तयार असेल. पर्यावरण पूरक, शैक्षणिक, सामाजिक महिलांसाठी काम करण्याचा मानस आहे. यासाठी आम्हाला आमच्या क्लबच्या चार्टर प्रेसिडेंट छाया शेवाळे यांचे मार्गदर्शन आहे असे प्रेसिडेंट निर्मला वीर यांनी आपले मत व्यक्त केले.

-------------------------

राजू सनदी, कराड 9822308552

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक