कराड तालुका पोलीसांनी बेकायदेशीर अवैद्य गुटखा पकडला; साडे तेरा लाखाचा मुद्देमाल जप्त...
कराड तालुका पोलीसांनी बेकायदेशीर अवैद्य गुटखा पकडला; साडे तेरा लाखाचा मुद्देमाल जप्त...
कराड दि.18-कराड चांदोली रोडवर बेकायदेशीर गुटख्याची अवैध वाहतूक कराड तालुका पोलिसांनी रोखले असून सुमारे 13 लाख 64 हजार 960 रुपये किमतीचा मुद्देमाल एका आरोपीसह पोलिसांनी हस्तगत केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आचंल दलाल ,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांनी सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थ/गुटखा आणि दारुबंदी कारवाई करणेकामी विशेष मोहिम आयोजित करुन कारवाई करणेकामी सुचना दिल्या होत्या. सदर कारवाई अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व कराड तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शानाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेस गोपनीय माहिती मिळाली की कराड उंडाळे रोडने एक छोटा हत्ती वाहन अवैद्य गुटखा घेवुन जाणार आहे त्या माहितीची खातरजमा करुन कराड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगताप सो यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी, सतीश जाधव व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार सज्जन जगताप, सचिन निकम, प्रफुल्ल गाडे तसेच पो.हवा. धनजंय कोळी, संदीप पाटील, सुनिल माने, विनोद माने, नितीन कुचेकर, नाना नारनवर यांनी आज दि. 17/05/2024 रोजी दुपारी मौजे घोगाव, ता. कराड गावचे हद्दीत, कराड चांदोली रोडवर आरोपी नामे समीर बाबासो मुलाणी वय 36 वर्षे, रा. लाहोटीनगर, मलकापुर, कराड जि. सातारा हा त्याचे ताब्यातील अशोक लेलंड कंपनीचा छोटा हत्ती टॅम्पो क्र. MH-50- N 2982 मधून एकुण 13,64,960/- रुपये किंमतीचा विमल पान मसाल्याच्या पिशव्या व तंबाखु पुड्या या मालाची जनआरोग्याच्या दृष्टीकेनातुन प्रतिबंध करुन वाहतूक केली म्हणुन एकुण 9 लाख 64000/- रूपयांचा मुद्देमाल व 4,000,00/- च्या वाहनासह जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश जाधव, हे करीत आहेत.
वरील कामगिरी मा. पोलीस अधिक्षक सातारा श्री. समीर शेख सो तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आचंल दलाल सो.मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकुर सो कराड व पोलीस निरीक्षक श्री महेंद्र जगताप सो कराड तालुका पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली कराड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी, सतीश जाधव व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार सज्जन जगताप, सचिन निकम, प्रफुल्ल गाडे तसेच पो.हवा. धनजंय कोळी, संदीप पाटील, सुनिल माने, विनोद माने, नितीन कुचेकर, नाना नारनवर यांनी केली आहे.

Comments
Post a Comment