पुणे बेंगलोर महामार्गावर गोवा बनावटीचा अवैद्य मद्य साठा जप्त...
कराड -पुणे बेंगलोर महामार्गावर गोवा बनावटीचा अवैद्य मद्य साठा जप्त...
कराड दि.28-पुणे बेंगलोर महामार्गावर शिरवडे गावच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने गोवा बनावटीचा मध्ये साठा जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कराड कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक सुर्वे, विभागीय उप-आयुक्त विजय चिंचाळकर यांचे मार्गदर्शनाखाली व श्री. वैभव वैदय राज्य उत्पादन शुल्क सातारा अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कराड या कार्यक्षेत्रात दि. 27/04/2024 रोजी शिरवडे ता. कराड या गावच्या हद्दितून जाणाऱ्या जिल्हा मार्गावर लोकसभा 2024 च्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी करत असताना अवैद्य मद्याची वाहतुक करणारा एक संशयीत आयशर टेरा 16× PE CAB&TIPP कंपनीचा Dumper (HGV) क्र. MH-07-C-5971 सहाचाकी वाहन निदर्शनास आले वरुन सदर वाहनाची झडती घेतली असता त्या मध्ये गोवा राज्य विक्री करीता असलेला विदेशी मद्याचे एकूण 400 बॉक्स म्हणजेच 750 मिली क्षमतेच्या 4800 सिलबंद बाटल्या मिळून आल्या. तसेच सदर सहाचाकी वाहन व एक मोबाईल संच असा एकूण रुपये 32,43,000/- किंमतीचा दारुबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हामध्ये संशयीत इसमनामे किरण कृष्णा नाईक वय 22 वर्षे रा.सतमत बांधा ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग यास महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (अ) (ई) 80,83,108 अन्वये आरोपीत अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मध्ये निरीक्षक श्री. एस. एस. साळवी, दुय्यम निरीक्षक डॉ. उमा पाटील, दुय्यम निरीक्षक श्री. शरद नरळे, सहा.दु.निरीक्षक. श्री.पी.आर. गायकवाड, जवान श्री. व्ही. व्ही. बनसोडे, व महिला जवान राणी काळोखे यांनी सहभाग घेतला.
सदर गुन्ह्यातील तपास डॉ. उमा पाटील, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कराड या करत आहेत.
जिल्ह्यामध्ये बनावट दारु तसेच हातभट्टी दारु निर्मीती, विक्री, वाहतुक तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या दारुची निर्मीती, विक्री व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ या कार्यालयास देण्यात यावी असे आवाहन अधीक्षक, श्री. वैभव वैदय राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांनी केले आहे.

Comments
Post a Comment