दोन वर्ष तडीपार असलेला सराईत आरोपीस कराड शहर डी. बी. पथकाने केले अटक...
दोन वर्ष तडीपार असलेला सराईत आरोपीस कराड शहर डी. बी. पथकाने केली अटक...
कराड दि. 10-तीन महिन्यापूर्वी कराड शहरातील मंगळवार पेठेत असणाऱ्या पालकर वाड्यातील साहिल मुजावर यास सातारा सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र तरीही तो शहरात वास्तव्यात असल्याची माहिती मिळताच कराड शहर डी बी पथकाकडून त्यास जेरबंद करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत हद्दपार गुन्हेगार साहील आलम मुजावर रा.121. पालकरवाडा मंगळवार पेठ, कराड व त्याचा साथिदारास पोलीस अधीक्षक यांनी 11 जानेवारी 2024 रोजी पासून दोन वर्षासाठी सातारा तसेच सांगली जिल्हयातील काही तालुक्यातुन हद्दपार केले होते. मात्र तरी देखील हा सराईत हद्दपार गुन्हेगार साहील आलम मुजावर याने पोलीस अधीक्षक यांचे आदेशाचे उल्लंघन करुन पालकरवाडा मंगळवार पेठ येथे छुप्या स्वरुपात वावरत होता.
दरम्यान ही गोपनीय माहिती कराड शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक के. एन. पाटील यांना मिळाली होती. त्याबाबत त्यांनी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप निरिक्षक पतंग पाटील यांना माहिती दिली. पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील व सहाय्यक पोलीस उप निरीक्षक देवकुळे, पोलीस कॉन्स्टेबल आनंदा जाधव यांनी तात्काळ पालकर वाड्यात दाखल होत हद्दपार आरोपी साहिल मुजावर यास ताब्यात घेत त्याचेवर हद्दपार आदेशाचे उलंघन केलेबाबत गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप निरिक्षक पतंग पाटील, सफौ देसाई, सफौ देवकुळे, पोलीस हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक कुलदिप कोळी, आनंदा जाधव, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.

Comments
Post a Comment