कराड -पहिल्याच दिवशी २४ नागरिकांनी भरला कर...
कराड -पहिल्याच दिवशी २४ नागरिकांनी भरला कर...
पालिकेच्या वतीने करदात्यांचा सत्कार...थकबाकी विरोधातील कारवाई मोहीम सुरूच राहणार...
कराड दि.1-सोमवारी नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी २४ मिळकतधारकांनी सुमारे सव्वा लाखांचा कर भरला. पहिल्या दिवशी कर भरून अन्य मिळकतधारकांना चांगला संदेश देणाऱ्या करदात्यांचा कराड नगरपालिकेच्या कर वसुली विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान गेल्या आर्थिक वर्षातील थकबाकीधारकांविरोधातील वसुलीची मोहीम सुरुच राहणार असल्याचे कर अधिकारी प्रफुल्लकुमार वनखंडे यांनी सांगितले.
सन २०२४-२५ या नवीन आर्थिक वर्षाची सोमवारी सुरुवात झाली. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विराज बोराडे, देविदास शानभाग, गोपाळ कुलकर्णी, श्रीधर कुलकर्णी, हणमंत ढेरे, राजेंद्र ढेरे, तुषार खराडे, सुनिता खराडे, शशांक खराडे, तेजस्विनी खराडे, अरुणा शिंदे, रोहिणी अजय शिंदे, मंगेश कुलकर्णी, वैभव पाटील, भाग्यश्री रेठरेकर, एन डी इनामदार, रघुवीर कुलकर्णी, सुजाता पवार, अरुणा शिंदे, अतुल शिंदे, मिनाज भालदार, राजश्री कुलकर्णी, प्रतिभा जाधव, राजेंद्र चव्हाण, दत्तात्रय जगताप आदींनी सुमारे १२५७१६/- रुपये इतका कर पालिकेकडे जमा केला.
पहिल्या दिवशी कर भरणाऱ्या सर्व करदात्यांचा पालिकेच्या उपमुख्याधिकारी सुविधा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कर अधिकारी प्रफुल्लकुमार वनखंडे, साबळे मॅडम, पेठ लिपीक सुनील बसरगी, युवराज शिंदे, शुभम चावरे, इखलास शेख, फैय्याज शेख, राजेंद्र ढेरे, मधुकर रेठरेकर, पांडुरंग संकपाळ, जितेंद्र मुळे, सुरेश जाधव, अय्याज आतार, अमित इनामदार इतर सर्व कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
राजू सनदी कराड
Karad Today News


Comments
Post a Comment