कराड अर्बन बँकेचा संचालक-सेवक स्नेहमेळावा आणि सेवक वेतन कराराचे नुतनीकरण...
कराड अर्बन बँकेचा संचालक-सेवक स्नेहमेळावा आणि सेवक वेतन कराराचे नुतनीकरण... कराड दि.30-दि कराड अर्बन को-ऑप. बँकेचा संचालक-सेवक स्नेहमेळावा येथील वीटस् सत्यजित या पंचतारांकीत हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. बँकेने सन २०२३-२४ मध्ये रू.५१०० कोटी व्यवसायपूर्ती आणि नेट एन.पी.ए. शून्य टक्के या ऐतिहासिक कामगिरीच्या निमित्ताने सदर संचालक सेवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने बँकेचे ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, माजी ज्येष्ठ संचालक प्रा. विद्याधर गोखले, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, बँकेचे संचालक व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तसेच बँकेच्या सेवकांच्या हस्ते ५१०० कोटींचा उल्लेख असलेला केक कापण्यात आला. बँकेच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव व त्यांच्या सुविद्य पत्नी अर्बन बझार व डॉ.द.शि. एरम अपंग सहाय्य संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. जयश्री गुरव यांचा बँकेच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेच्या सन २०२४-२०२९ याकाल...