फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी संशोधनाचा पाया भक्कम करावा : डॉ. सुरेश भोसले...


फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी संशोधनाचा पाया भक्कम करावा : डॉ. सुरेश भोसले...

कृष्णा विद्यापीठात फार्मसी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय परिषद उत्साहात; ७५० विद्यार्थ्यांचा सहभाग....

कराड, दि .7: फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी औषधनिर्मितीचे नवनवीन तंत्र आत्मसात करून, संशोधनाचा पाया भक्कम करावा, असे प्रतिपादन कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व असोसिएशन ऑफ फार्मसी टीचर्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि वाठार येथील जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तसेच कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या सहकार्याने कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या परिषदेत सुमारे ७५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ. पी. एस. पाटील, कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, फार्मसी विभागाचे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव, प्राचार्य डॉ. ए. व्ही. यादव, जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. आर. आर. भोसले, आरोग्यलाभ फाउंडेशनचे संचालक डॉ. एस. बी. भिसे, प्राचार्य सौ. शुभांगी पाटील यांची उपस्थिती होती. 

या परिषदेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत १७० विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक पोस्टरचे सादरीकरण केले. या स्पर्धेत ऐश्वर्या पाटील, रितिका कोंडुसकर, कीर्ती महामुनी, सौ. प्रतीक्षा जाधव यांनी बक्षीसे प्राप्त केली. कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. डॉ. एन. आर. जाधव यांनी प्रास्तविक केले. प्रा. ज्योत्स्ना गांधी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अनुप पाटील यांनी आभार मानले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक