प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावलेच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम....
प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावलेच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम....
तळमावले दि.4- प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले व सर्व उपकेंद्र काढणे, गुढे, खळे, कुंभारगाव, तसेच सर्व अंगणवाडी अंतगँत 0 ते 5 वयोगटातील सर्वाना पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी रित्या राबविण्यात आली.
तळमावले परिसरातील सर्व ऊसतोड मजुर, रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांच्या झोपडीत जाऊन दिनांक 2/3/2024 रोजी पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले. दिनांक 3/3/2024 पल्स पोलिओ बुथचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय देसाई, तळमावले ग्राम पंचायतचे सरपंच सुरज यादव, तसेच विविध गावचे सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर बी. पाटील सर, वैद्यकीय अधिकारी डॉ.अभय पवार सर, डॉ.नितीन वांगीकर सर, आरोग्य सहाय्यक शरद कांबळे, जामसिंग पावरा आरोग्य सेवक रोहित भोकरे, स्वप्निल कांबळे, विलास फाळके, आरोग्य सेविका रंजना कुंभार, विद्या लोहार, सोनाली परिट, सुप्रिया पवार, प्रियांका गारदी समुदाय आरोग्य अधिकारी धैर्यशिल सपकाळ, नितीन माने, अकबर मुल्ला, सुप्रिया यादव, पाटील मँडम, कोमल महादर, निलम डुबल, सुजाता सातपुते सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका, अध्यँवेळपरिचारीका उपस्थित होत्या.
राजू सनदी कराड


Comments
Post a Comment