कराड येथे बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन....


कराड येथे बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन....

कराड दि.2-राष्ट्रीय NGO महासंघ संबंध संस्था शंभूरत्न परिवर्तन फौंउंडेशनच्या वतीने कराड येथे दिनांक 1 मे 2024 रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत बिगर हुंडा सामूदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. काळाच्या गरजेनुसार अशा विवाह सोहळ्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम या सर्व गोष्टींची बचत होऊन विनाकारण होणाऱ्या प्रचंड खर्चाचे बचत होणार आहे; म्हणूनच हा सामाजिक उपक्रम कराड येथे शंभुरत्न परिवर्तन फौंउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राबविला जात आहे. 

ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे, फळबाजी विक्रेते, वंचित, दारिद्र्य रेषेखालील असणारे अशा गरीब कुटुंबांसाठी सामाजिक बांधिलकी  जपून मदतीचा हात देण्यासाठी कराड येथे बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी विवाह ठरलेल्या जोडप्यांनी दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी पर्यंत आपली नाव नोंदणी करावी असे संस्थेच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे. 

महारष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील, तालुक्यातील नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन आपल्या मुला मुलींच्या विवाहासाठी होणाऱ्या अवास्तव खर्चाचे नियोजन त्यांच्या भावी आयुष्यासाठी करावे व आर्थिक बचत करून आपल्या नवीन संसारास सुरुवात करावी या उदात्त हेतूने संस्थेने या विवाह सोहळ्यात भाग घेणाऱ्या जोडप्यांना मणी मंगळसूत्र, वधू-वरांचा पोशाख, संसार उपयोगी भांडी संच, तसेच वधू- वरांकडील मर्यादित लोकांची भोजन व्यवस्था व लग्न विधीसाठी लागणारे सर्व सोपस्कार संस्थेमार्फत पुरविले जातील.नाव नोंदणी दिनांक १५ एप्रिल २०२४ पर्यंत करावी.  अधिक माहितीसाठी संपर्क:-९५०३८००७७७, ७५८८९४९६९२, ९७६४१४१५३२

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक